Type Here to Get Search Results !

माणुसकी वृध्दसेवालयाच्या नवीन वास्तूचे मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन.! लक्ष्मी पंडित हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन!!




 दिशा लाईव्ह न्यूज -:-:  सु-लक्ष्मी बहुउद्देशीय  सेवाभावी संस्था संचालित माणुसकी वृद्ध सेवालयाच्या नूतन वस्तूचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचे हस्ते होणार आहे.तत्पूर्वी लक्ष्मी पंडित हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद अनासपुरे सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते  व प्रकाशजी भागवत.सिने अभिनेते येड्याची जत्रा फेम,तथा हास्य कलाकार.

अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण सुनिल लांजेवार,पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ, हर्सुल पोलीस स्टेशन,भारत सोनवणे (माजी अधिष्ठाता घाटी)हे उपस्थित राहणार आहेत. 



 शासकीय रुग्णालय घाटी येथे रक्ताचा तुटवडा असल्यामुळे संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्तदानासाठी यावे असे आव्हान माणुसकी समुहातर्फे सुमित पंडित यांनी केले आले आहे. हा कार्यक्रम माणुसकी वृद्ध सेवालय येथे गट नंबर ४४ गावंदरी तांडा कामधेनू कॉलेजच्या समोर जटवाडा रोड छ.संभाजीनगर येथे रविवारी दि. २९-१२-२०२४.-रोजी सकाळी १०:०० ते ०२:०० पर्यत रक्तदान शिबीराने सुरवात होईल.दुपारी ०२:१५ वा.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते माणुसकी वृध्द सेवालयाचे उद्घाटन सोहळा पार पडेल.



या कार्यक्रमासाठी माणुसकी समुहाच्या पाठीशी भक्कम उभे  राहणार्‍या दात्यांनी आपणच दाखवलेल्या दातृत्वातून उभ्या राहिलेल्या वस्तूच्या उद्घाटन सोहळयाचे कौतुक पहाण्यासाठी उपस्थित राहावे  ही विनंती माणुसकी समुहाच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments