आज दि.7 रोजी मल्हार देवाचा विजयी दिवस
म्हणुन
प्रत्येक घरात हिंदु धर्माच्या शास्त्रानुसार खंडोबारायाच्या उपासना , पुजा , व आराधनेसाठी सपार्पित असतो
& प्रत्येक घरामध्ये तळी उठवली जाणारच म्हणुन दिशा लाईव्ह न्यूज स्पेशली आरती प्रसारीत करत आहे......
खंडोबा महाराज तळी आरती ||
॥ बोल खंडेराव महाराज की जय ॥
बोल सदानंदाचा येळकोट
॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥
हर हर महादेव ॥ चिंतामण मोरया ॥
भैरोबाचा चांदोबा ॥ अगडबंब नगारा ॥ सोन्याची जेजुरी ॥ मोत्याचा तुरा ॥
निळा घोडा ॥
पाई तोडा ॥
कमर करगोटा ॥
बेंबी हिरा ॥
गळयात कंठी ॥
मोहन माळा ॥
ङोईवर शेला ॥
अंगावर शाल ॥
सदा हिलाल ॥
जेजुरी जाई ॥
शिकार खेळी ॥
म्हाळसा सुंदरी ॥
आरती करी ॥
देवा ओवाळी ॥
नाना परी ॥
देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा ॥ खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका ॥
बोल सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥

Post a Comment
0 Comments