दिशा लाईव्ह न्यूज -:- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित ,डॉ. जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील दिनांक ६ डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्यद्यापक एस व्ही शिंदे सर होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपले मनोगत सादर केले .यावेळी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक आर के सुरवाडे सर यांनी संविधान सभेचे वाचन करून विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित माहिती सांगून गीत सादर केले. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक पि यू खरे सर यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले .तर आभार एस एस गुजर सर यांनी मानले .
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments