Type Here to Get Search Results !

शेंदुर्णी नगर पंचायत येथे नगरपंचायती मध्ये घाणीचे साम्राज्य माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्यात क्रमांक दोन चा पुरस्कार दोन वेळेस फक्त कागदावरच राहिले...

 


दिशा लाईव्ह न्यूज -:--- संतोष महाले -----नाव मोठे लक्षण खोटे असलेला प्रकार शेंदुर्णी,ता.जामनेर  नगरपंचायत येथे अनुभवास येत आहे ,.

शेंदुर्णी नगरपंचायत च्या प्रवेशद्वाराजवळच नागरिकांसाठी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बैठक आसनाजवळ घाणीचे साम्राज्य असून लोकास सांगे ब्रह्मज्ञान आपले कोरडे पाषाण अशी गोष्ट अनुभवास येत आहे. 



स्वतः नगरपंचायतीच्या कार्यालयात इतके घाण्याचे साम्राज्य असेल तर गावात आपण विचार न  केलेलाच बरा .


गावात आरोग्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत .नाले सपाई केरकचरा गटार सफाई स्वच्छालय याच्या नियोजनात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ,आरोग्य विभागाचे प्रमुख सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे .


आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून दिवसभरातून आठ तासाची ड्युटी काम करून देखील रात्री उशिरापर्यंत काम घेऊन गावसपाईचे कारनामे फक्त देखाव्यापूर्वती दिसत असून सुज्ञ नागरिकांचे यावर प्रतिक्रिया घेतली असता खूप मोठा राग रोष दिसत आहे. 

नको ते सगळे कर टॅक्स नगरपंचायत इकडून वसूल केले जात असून नागरिकांना सुविधा देण्यास मात्र नगरपंचायतीला सपशेल अपयश आले असल्याचे बोलले जात आहे ,तसेच दिसून येत आहे .



Post a Comment

0 Comments