दिशा लाईव्ह न्युज - शंकर भामेरे पहूर , ता . जामनेर -
रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड व ज्ञान उदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील हिंदी साहित्य संमेलन सभागृह सीताबर्डी येथे 19 व्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
या सोहळ्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश येथून पुरस्कारार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार किरणजी सिंह(शहीद भगतसिंग यांचे पुतणे) हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गुरुत्येसिंह ब्रार, श्री अतुलजी निकम, मराठी सिने अभिनेत्री मृणाल गायकवाड, मिसेस इंडिया श्रीमती रूपाली वशिष्ठ, श्रीमती बिंकल शुक्ला ह्या होत्या.
पाहुणेमंडळीच्या हस्ते पहुर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री विलास भालेराव सर व विद्या भालेराव मॅडम यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम या नृत्याने झाली. कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर क्रांती महाजन यांनी केले होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री दिगंबर तायडे, शकुंतला तायडे मुंबई, डॉक्टर क्रांती महाजन, डॉक्टर प्रसन्न, डॉक्टर भावना, डॉक्टर पल्लवी, यांनी सर्वांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


Post a Comment
0 Comments