Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न!!

 


               कुऱ्हाड प्रतिनिधी :-:सुनील लोहार 

पाचोरा तालुका शिक्षण  संस्था संचलित कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात आज शनिवारी सकाळी विविध कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेत.  सन 2004 चे दहावीचे माजी विद्यार्थी, शाळेचे शिक्षक व विद्यालयाच्या एकत्रित देणगीतून एकूण 68 हजार रुपये किमतीचे असलेले दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पाचोरा तालुका  गट शिक्षण अधिकारी समाधान पाटील यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. 


त्यानंतर शाळेत  सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री समाधान पाटील  आणि केंद्रप्रमुख श्रीयुत पटेल सर यांनी परीक्षण करून विद्यार्थिनींना प्रथम ,द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.


कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र  त्यात राष्ट्रीयत्व अधिवास  आणि जातीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  श्री.एस.एम.पाटील यांनी केले, सूत्रसंचालन  आर एस माळी व श्रद्धा पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुधाकर गायकवाड यांनी मानले. 

कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments