Type Here to Get Search Results !

द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या जिल्ह ग्रामीण अध्यक्षपदी सुमित पाटील,वावडदा यांची तर जामनेर तालुकाध्यक्ष पदी बाळू मोहन जोशी यांची नियुक्ती!!



जामनेर तालुकाध्यक्ष- बाळू मोहन जोशी.


            जळगांव ग्रामीण अध्यक्ष--सुमित पाटील,वावडदा.


दिशा लाईव्ह न्यूज -:--द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे   युवा संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि राज्य उपाध्यक्ष जिवन मोहिते आणि जळगांव जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी, लोहारा यांच्या  अध्यक्षतेखाली जळगांव ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदि वावडदा येथील पत्रकार सुमित जांनकिराम पाटील यांची, तर जामनेर तालुकाध्यक्ष पदी वाकडी येथील युवा पत्रकार बाळू मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे.


निवड झालेल्या मान्यवरांचे  जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी, उपाध्यक्षपदी सागर लव्हाळे , जिल्हा सचिव मोहन पंडित दुबे, जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण अनंतराव चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत शांताराम पाटील, जिल्हा सहसचिव शंकर रंगनाथ भांमेरे, जिल्हा संघटक संतोष रमेश महाले, जिल्हा खजिनदार सुनील रमेश लोहार, तसेच जिल्हा कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. शिवाजी गोरे यांनी दोघे पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले आहे.


यावेळी  जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली आहे. . द युवा ग्रामीण पत्रकार  संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि राज्य उपाध्यक्ष जीवन मोहिते यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारणीचे द ग्रामीण युवा पत्रकार संघामध्ये स्वागत केले आहे. 

संघाचे कार्य हे अतिशय उत्कृष्ट प्रमाणे पार पाडण्यात यावे अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

यावेळी जळगाव ग्रामीण पत्रकार अध्यक्ष नव नियुक्त  बापूसाहेब सुमित पाटील यांनी संघाचे काम अतिशय उत्कृष्ट प्रमाणे सांभाळण्यात येईल अशीही संस्थापक अध्यक्ष यांना ग्वाही दिली आहे.

 द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी निवड झालेले बाळू मोहन जोशी यांनीही प्रथम संस्थापक अध्यक्ष, आणि राज्य  उपाध्यक्ष, संपूर्ण  टीम व जळगांव जिल्हाध्यक्ष यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे... 

लवकरच  सर्व तालुका निहाय कार्यकारिणी तयार करू आणि संघटनेस बळ देऊ, नक्कीच संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करू, आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ. संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकाध्यक्ष  व सदस्यांची वाढ करीन असेही जिल्हाध्यक्ष  दिनेश चौधरी यांनी यावेळी सांगितले.



Post a Comment

0 Comments