दिशा लाईव्ह न्यूज -कृष्णा पाटील, तोरणाळा -:- मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा मौजे राजुरा ग्रामपंचायत चे सरपंच सौ. पुष्पा अशोक भोलांनकर व सदस्य श्री.अशोक शालीग्राम भोलानकर , सौ. नर्मदा योगेश कांडेलकर यांची सार्वत्रिक निवडणुक 2021 चे निवडणुकीत अनुसूचित जमाती (एस. टी.) या राखीव प्रवर्गामधून ग्रामपंचायत सदस्य म्हणून वरील तिन्ही सदस्य यांची बिनविरोध निवड झाली होती.
तसेच सौ. पुष्पा अशोक भोलांनकर हे ग्रामपंचायत राजुरा येथे सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या.
सविस्तर असे की, आरक्षित जागेवर निवडून आलेले उमेदवार यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) अन्वये आरक्षित जागेवरती निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बाबत (दोन) मध्ये खालील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे की, "ती व्यक्ती निवडून आल्याच्या घोषित झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्याच्या मुदतीच्या आत, वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास, निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे माण्यात येईलआणि ती,सदस्य म्हणून राहण्यास निरर्ह ठरेल"
.वरील तिन्ही निवडणूक लढविणाऱ्या वरील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत हमीपत्र लिहून सादर केले आहे.निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास माझी निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल, आणि मी ग्रामपंचायत सरपंच / सदस्य राहण्यास अपात्र ठरेन,याची मला जाणीव आहे.तरी निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र तहसिल कार्यालय निवडणूक शाखा किंवा ग्रामपंचायत कार्यालयात सादर करणे बंधनकारक असताना ग्रामविकास विभाग यांचा दिनांक 10 मे 2022 रोजीच्या शासन-परिपत्रकानुसार माहे 2019 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव आरक्षित निवडणूक सादर करण्यास मुदतवाढ दिनांक 17 जानेवारी 2023 असे देण्यात येऊनही विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सौ.पुष्पा अशोक भोलानकर व सदस्य सौ.नर्मदा योगेश कांडेलकर, श्री अशोक शालिग्राम भोलानकर यांनी शासनाने दोन वर्ष जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढ देऊनही आजपर्यंत निवडणूक शाखा मुक्ताईनगर किंवा ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचा ठपका ठेवत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री संजय संतोष कांडेलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
मा.जिल्हाधिकारी यांनी त्यावर दि.11 एप्रिल,2023 रोजी व दि.02 मे,2023 रोजी सुनावणी ठेऊन त्यांचे म्हणने एकूण मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10 (1-अ) अन्वये जिल्हाधिकारी यांनी दि.06 जून,2023 रोजी आपात्रतेचे आदेश दिले होते. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 10 जुलै 2023 अन्वये या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून पुन्हा 12 महिन्याची जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतवाढ पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. यावर मा.जिल्हाधिकारी यांनी दि.25 जुलै, 2023 रोजी न्यायनिर्णय पारित करून पुन्हा पदावर कायम ठेवणे बाबत आदेश पारित केले होते. यावर श्री. संजय संतोष कांडेलकर यांनी पुन्हा दि.21 ऑगस्ट , 2023 रोजी जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशा नुसार तक्रार दाखल केली. संबधित तक्रार वरती.. मा.जिल्हाधिकारी यांनी आक्षेप घेऊन मा. तहसिलदार मुक्ताईनगर व गट विकास अधिकारी पंचायत समिती, मुक्ताईनगर यांचे कडून अहवाल मागणी करून दि.26 नोव्हेंबर,2024 रोजीचे नोटीस नुसार दि.03 डिसेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन पुनश्च मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958-59 चे कलम 10 (1-अ) अन्वये जिल्हाधिकारी यांनी दि.30 डिसेंबर,2024 रोजी आपात्रतेचे आदेश जारी केले..
Post a Comment
0 Comments