दिशा लाईव्ह न्यूज -:- शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . १० ) पत्रकार दिन व महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून शहर पत्रकार संघटना व पहूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने आज शुक्रवारी ( ता . १० ) पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित शिबिरात २८ दात्यांनी रक्तदान केले .
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले . अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले . प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लाठे यांनी प्रास्ताविक केले. .माजी सभापती प्रदीप लोढा , माजी सभापती बाबुराव घोंगडे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , ॲड . एस .आर . पाटील , रामेश्वर पाटील , मनोगत व्यक्त केले . रेड क्रॉस सोसायटीचे डॉ .ए .डी . चौधरी , शंकर जाधव , शरद पांढरे , विनोद थोरात , योगेश भडांगे , योगेश बनकर , रवी मोरे , ईश्वर देशमुख , राजू जेंटलमन , उपनिरीक्षक भरत दाते , पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे , इस्माईल शेख , सरफुद्दीन शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पोलीस कर्मचारी , पत्रकार बांधव , तरुणांनी रक्तदान केले . यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष जयंत जोशी , शरद बेलपत्रे , रवींद्र घोलप , डॉ . संभाजी क्षीरसागर , प्रवीण कुमावत , शांताराम लाठे , गणेश पांढरे , सादिक शेख , हरिभाऊ राऊत , किरण जाधव यांच्यासह सर्व पत्रकार व पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले . सूत्रसंचालन सचिव शंकर भामेरे यांनी केले . आभार मनोज जोशी यांनी मानले .
Post a Comment
0 Comments