Type Here to Get Search Results !

लोहारा येथील शेतकरी कन्येने विद्यापीठात पटकवले दोन सुवर्णपदक!! लोहारा गावाच्या यशोशिखरावर अजून एक मानाचा तुरा. जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह समाज बांधवांकडून शुभेच्छाचा वर्षाव!! मुलीच्या यशाने आईवडिलांना आले गहिवरुन.



दिशा लाईव्ह न्यूज-लोहारा--::--लोहारा,ता.पाचोरा येथील पल्लवी संदीप  चौधरी या विद्यार्थ्यांनीने  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र पिठातर्फे सिविल इंजिनिअरिंग मध्ये सुवर्णपदक पटकवल्या बद्दल पल्लवी चौधरीचे लोहारा व परिसरातील गावातून कौतुकाचा वर्षाव होत असून शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन करण्यात  येत आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीचा ३३ वा दीक्षांत समारंभ नुकताच दि.८ जानेवारी रोजी उ.म.विद्यापीठात राज्यपाल तथा कुलपती पी.सी.राधाकृष्णन याच्या अध्यक्षतेखाली व अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.एम.जगदीश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.


यावेळी पल्लवी चौधरी यांनी बी.इ.सिविल याविष्यात विशेष प्राविण्य मिळवल्या बद्दल तिचे राज्यपाल तथा कुलपती पी.सी.राधाकृष्णन यांनी सुवर्ण पदक देऊन सत्कार केला. पल्लवी चौधरी ही लोहारा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील  संदीप भगवान चौधरी व कविता चौधरी यांची कन्या असून ती जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकत होती.मला डॉ.जि.के पटनाईक, डॉ.मुजाईद हुसेन, प्रा.प्रवीण शिरुळे, प्रा.ज्योती माळी, प्रा.पंकज पुनासे यांचे मोलाचे  मार्गदर्शन व आई वडिलांचे प्रोत्साहणामुळेच मला यश प्राप्त झाल्याचे प्रतिक्रिया  पल्लवीने  दिशा लाईव्ह न्यूज जवळ व्यक्त केली.


ती येथील माजी सरपंच अमृत  भगवान चौधरी व ग्रामपंचायत सदस्या सौ.कल्पना चौधरी यांची पुतणी आहे.



Post a Comment

0 Comments