Type Here to Get Search Results !

फातिमा शेख भारतातील पहिल्या मुस्लिम महिला सेवाभावी शिक्षिका- प्रतिभा नरवाडे दाभाडे


                 जितेंद्र गोरे--जामनेर.

दिशा लाईव्ह न्यूज -:--- भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका, फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून सर्वांनी अभिवादन केले.

वारसा स्री शक्तीचा, वसा साऊ-जिजाऊचा, ध्यास समता सन्मानाचा अंतर्गत सदर अभिवादनाचा कार्यक्रम जामनेर येथील गुरुकुल कोचिंग क्लासेस हॉल येथे संपन्न झाला. याप्रसंगी से.नि. मुख्याध्यापिका प्रतिभा नसिकेत नरवाडे दाभाडे यांनी त्यांचा जीवनपटाला उजाळा दिला.‌ या कार्यक्रमात डॉ. मोहिनी मोरे यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने समायोजित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महा. अनिस ज. जि. उपाध्यक्ष नाना लामखेडे सर व सूत्रसंचालन महा. अनिस कार्याध्यक्ष बी. आर. पाटील सर यांनी तर जळगाव जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे आभार मानले.

व्यासपीठावर महाराष्ट्र अंनिस जामनेरचे उपाध्यक्ष रमेश गायकवाड, प्रधान सचिव भीमराव दाभाडे, म. फुले चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव जितेंद्र गोरे आदी. मान्यवर होते. तसेच कार्यक्रमास महा. अंनिसच्या शोभा बोऱ्हाडे, काशिनाथ गायकवाड, तसेच सय्यद रशिद व भुसावळ येथील सुधाकर चौधरी, मालती चौधरी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments