Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनसाठी मोठी बातमी. कॅप्शन-शेतकऱ्यांना दिलासा, पानंद रस्ते व वहिवाट मोकळी करून मिळणारच!!


                           दिशा लाईव्ह न्यूज

 दिशा लाईव्ह न्यूज-कृष्णा पाटील,-तोरणाळे-:-   जामनेर - तालुक्यातील अनेक ठिकाणचे अतिक्रमित व बंद झालेले   पांनंद, शेतशिवार रस्त्यांचे मार्ग मोकळे करून शेतकऱ्यांना वहिवाट मोकळी करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. 


जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतात जाण्याकरता तसेच शेतमाल शेतातून बाहेर काढण्याकरिता वारंवार रस्त्याची मागणी करीत असतात यांच्या अडचणी सोडविणे आवश्यक असल्याने रस्ते कालबद्ध रीतीने  खुले करणे व मातोश्री ग्रामसमृद्धी शेत /पानंद रस्ते योजनेअंतर्गत  बारामाहि वापरता येण्यासारखे कायमस्वरूपी रस्ते तयार करणे या करिता कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार होता .

या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील तोरणाळे, पठार तांडा, वसंत नगर, देऊळगाव, जळांद्री बुद्रुक.अश्या बऱ्याच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जामनेर तहसील कार्यालयात लेखी निवेदन देत असताना जामनेर तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या  निवेदनाचे स्वागत केले. व त्यांना संबोधित करताना  तालुक्यातील अश्या बऱ्याच शेतकऱ्यांची शेत रस्ते आम्ही स्वतः बांधावर जाऊन प्रश्न मार्गी लावलेले आहेत.बाकी असलेल्या शेतकऱ्यांचे  फास्टट्रॅक सुनवण्या घेऊन राहिलेल्या शेतकऱ्यांचेहि  प्रश्न जलत गतीने मार्गी लावन्याय येतील. तसे जळगाव जिल्हा अधिकारी साहेबाचे आदेशही आम्हाला प्राप्त झालेले आहेत.


त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ दिलेल्या निवेदनाचे गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांची बेठक घेऊन यावर चर्चा करणार आहोत असे जामनेर तहसीलदार साहेबांनी  शेतकऱ्यांना सांगितले, शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळाल्याने तहसीलदार याचे सर्वांनी अभिनंदन केले. 

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य चळवळीच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे रस्त्याच्या अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे समजते.




Post a Comment

0 Comments