दिशा लाईव्ह न्यूज -:- बांबरुड राणीच्या येथील तेली समाज विश्वस्त मंडळातर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांची 336 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अर्जुन चौधरी, अमोल चौधरी यांच्या शुभहस्ते विधिवत सपत्नीक पूजन करण्यात आले.
याप्रसंगी पाचोरा शहर तेली समाजाचे सचिव पत्रकार शांताराम चौधरी यांनी संतूचा संताजी कसा झाला या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ राम मनोहर लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन श्री दादाजी वाघ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश चौधरी यांनी केले .
कार्यक्रमाला सरपंच बुरहान तडवी ,ग्रामपंचायत सदस्य तुषार आढाव, मनोज वाघ, प्रकाश चौधरी, रवींद्र देशमुख ,युवराज काळे ,पांडुरंग पाटील, पंजाबराव आढाव ,हिम्मत चौधरी ,सुनील चौधरी ,दिल्लीकर बारकू चौधरी ,तेली समाजाचे सर्व विश्वस्त, ग्रामपंचायतचे सदस्य, भजनी मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शांतिमंत्राद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शांती मंत्राचे पठण शांताराम चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश चौधरी यांनी केले.
Post a Comment
0 Comments