दिशा लाईव्ह न्यूज :- : शिरपुरात दि. ५ जानेवारी २०२५ रोजी तेली समाज भुवन जागेचे भव्य भुमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. असुन सोबतच धुळे जिल्ह्यातील निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ व संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संताजीची प्रतिमा पूजन कार्यक्रम शिरपूर तेली समाज पंच मंडळ आयोजीत वरील सर्व कार्यक्रम दि.५ जानेवारी २०२५ रविवार रोजी सकाळी १० वाजता फिल्टर प्लॅन्ट जवळ, वैभव नगर, वरझडी रोड, शिरपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
भुमीपूजन शुभहस्ते शिक्षण माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, पणन व शिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते तर सत्कारमुर्ती आ. काशिराम पावरा आमदार शिरपूर, आ. सौ. मंजुळाताई गावीत आमदार साक्री विधानसभा, आ. अनुप अग्रवाल आमदार धुळे महानगर, आ. राम भदाणे आमदार धुळे ग्रामीण यांचा सत्कार करण्यात येणार असुन दिप प्रज्वलन विजय चौधरी प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र, माजी खा. रामदास तडस, ना. सौ. धरतीताई देवरे अध्यक्षा जि.प. धुळे, प्रा. भुषण कर्डिले महामंत्री म. तै. महासभा, माजी खा. डाॅ. सुभाष भामरे, गजानन शेलार कार्याध्यक्ष तैलिक महासभा यांचा हस्ते होणार आहे.
संत जगनाडे महाराज प्रतिमा पुजन भुपेशभाई पटेल चेअरमन प्रियदर्शिनी सुतगिरणी, देवेंद्र पाटील उपाध्यक्ष जि. प. धुळे, शिरीष चौधरी माजी आमदार अमळनेर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी अध्यक्ष तेली समाज पंच मंडळ शिरपुर हे असणार आहेत.
याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहान तेली समाज पंच मंडळ उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव जगदीश चौधरी, सहसचिव रमेश चौधरी, सदस्य सुरेश चौधरी श्यामकांत ईशी, संजय चौधरी, ईश्वर चौधरी, चंद्रवधन चौधरी, मोहन चौधरी, महेश चौधरी, नरेश चौधरी, युवराज चौधरी, दुर्गेश चौधरी, विजय चौधरी, जितेंद्र चौधरी, योगेश चौधरी, उत्तम चौधरी, विजय चौधरी, सुरेंद्र चौधरी, सुनिल चौधरी, श्री. संताजी मित्र परिवार, श्री. विघ्नहर्ता प्रतिष्ठान, श्री. संताजी मित्र मंडळ, श्री. खान्देश तेली समाज, तेली समाज महिला मंडळ शिरपुर तर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments