दिशा लाईव्ह न्यूज -:- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित, डॉ. जे जी. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी कै. द्रुपदाबाई यादव सरोदे यांच्या सातवे पुण्यस्मरणार्थ " कृतज्ञता "दिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना अपेक्षित संच वाटप व पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे संस्थेचे सहसचिव दादासो, श्री. यु .यु. पाटील सर होते .तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व कृषिरत्न विश्वासराव आनंदराव पाटील ,विशेष अतिथी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष व मा.मुख्यधयापक अ. अ. पटेल सर ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. यु .डी शेळके मॅडम व सेवानिवृत्त प्राचार्य एन एम भामरे, सल्लागार समिती सदस्य दत्तू भिका माळी , विकासी माजी चेअरमन शिवराम भडके साहेब ,माजी मुख्याध्यापक आर एस चौधरी सर ,प्राचार्य शैलेंद्र शेळके, महेंद्र आप्पा शेळके गावातील पत्रकार , विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे सर, पर्यवेक्षक पी. एम .सुर्वे सर तसेच पंचक्रोशीतील नागरिक व भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर गावकरी मंडळी यांच्या हस्ते सरस्वती माता व कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड कैलासवासी द्रुपदाबाई यादव सरोदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
सरोदे परिवाराकडून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास सरोदे यांनी केले ."पुण्यस्मरण कृतज्ञता" दिनानिमित्त चे महत्त्व त्यांनी सांगितले .
सरोदे परिवारातर्फे लोहारा विद्यालयातील इयत्ता दहावीतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी 13 अपेक्षित संचांचे वाटप करण्यात आले तसेच शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार सरोदे परिवारातर्फे देण्यात आला..
हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. यु यु पाटील सर प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र ,ट्रॉफी ,पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच विद्यालयातील शांत,सुस्वभावी ,आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य करणारे प्रतिभावंत उपशिक्षक श्री. वाय पी वानखेडे सर यांना शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल" आदर्श शिक्षक" पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हा पुरस्कार शेंदुर्णी संस्थेचे सहसचिव यु यु पाटील सर व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले .
सन्मानपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ व शाल अशा स्वरूपात पुरस्कार वितरित करण्यात आला .सन्मानपत्राचे वाचन विद्यालयातील मुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम व सुभाष सरोदे यांनी केले.
तसेच जिल्हा परिषद शाळा येथील विचारवंत शिक्षक श्री अंकुश भुत्ते यांचा सुध्दा "आदर्श शिक्षकाच्या" स्वरूपात ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
विद्यालयातील विद्यार्थी ललित ज्ञानेश्वर चौधरी, ,विद्यार्थिनी अनुजा योगेश पाटील यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थीनी सरोदे परिवाराचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. विशेष अतिथी येणे भामरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयातील उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्वासराव आनंदराव पाटील यांनी आपल्या मनोगत पर भाषणातून सत्कार अर्थी चे कौतुक करून विविध शैक्षणिक कार्याविषयी मार्गदर्शन केले .
विद्यार्थ्यांना जाणता राजा या पुस्तकांचे वाटप करण्यात आले .संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांनी आपल्या मनोगत पर भाषणातून लोहारा विद्यालयाची स्थापना कशाप्रकारे झाली होती? वाढीसाठी कसे प्रयत्न केले ?याविषयी थोडक्यात माहिती दिली.
पुरस्कार दिल्याबद्दल सरोदे परिवाराचे आभार मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव यु यु पाटील सर यांनी आपल्या भाषणातून सरोदे परिवाराने राबवलेल्या विशेष उपक्रमाचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सरोदे यांनी केले व आभार मानले.
स्वतंत्र विचाराचे आणि निर्भीड बाण्याचे!! महाराष्ट्रातील तुम्हां सर्वांचे आवडते सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल--
फक्त- दिशा लाईव्ह न्यूज.
संपादक -:- दिनेश चौधरी, लोहारा. (मेणगावकर )
पाचोरा ता. मुख्य संघटक -:- माहिती अधिकार कार्यकर्ता संघटना महाराष्ट्र राज्य.
जळगांव जिल्हाध्यक्ष -:- द युवा ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य.
9309919030
9981028027
Post a Comment
0 Comments