Type Here to Get Search Results !

पहूर येथील चोरीची घटना,चोरीचे केले नाटक!! किराणा दुकानातून रोख रक्कम घेऊन पोबारा करणारा निघाला दुकानातील कर्मचारी!! पहूर पोलिसांची दमदार कामगिरी.



दिशा लाईव्ह न्यूज -:-  गेल्या महिन्यात 28 डिसेंबर रोजी  पहूर,ता.जामनेर किराणा दुकानदाराची 96 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली होती .

गेल्या अनेक दिवसांपासून या किराणा दुकानात काम करणाऱ्या युवकानेच चोरीचे नाटक करून तो स्वतः या प्रकरणात फसला आहे. कैलास शंकर सटाले वय 35 राहणार मुंदखेडा तालुका जामनेर असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून पहूर पोलिसांनी त्यास शीताफीने अटक केली आहे.

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर  जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गालगत असलेल्या किराणा दुकानाची मालविक्रीची 96 हजार रुपयांची रोख रक्कम वर्धमान स्टील दुकान मालक उज्वल सिसोदिया यांचेकडे जमा करण्यासाठी जात असतांना 28 डिसेंबर रोजी सायंकाळच्या वेळेस त्याच्या हाताला अज्ञात चोरट्यांनी धक्का देऊन बॅगसह रक्कम लांबविल्याबिबत पहूर  पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचा तपास पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते ,सागर गायकवाड हे करीत होते. दरम्यान पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, गोपाल गायकवाड ,विनोद पाटील, ईश्वर पाटील ,ज्ञानेश्वर ढाकरे ,राहुल पाटील, जिजाबराव कोकणे ,या पथकाने यशस्वी चौकशी करून जामनेर पहूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दूचाकी वरील पळून जाणारे चोरटे निष्पन्न झाले नाही. अखेर किराणा दुकानावर कामास असलेल्या कैलासला अटक करण्यात आली आहे

     -आरोपी कैलास कडून पोलिसांनी केले 75 हजार रुपये हस्तगत-

   अखेर किराणा दुकान वर कर्मचारी असलेल्या कैलास सटाले या आरोपीस पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीचा हिसका दाखवताच मीच चोरी केल्याचे कबूल केले. आणि चोरीचे नाटक केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

 कैलास सटाले या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 75 हजार रुपये रोख हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना व आमच्या असंख्य वाचकांना  मनःपूर्वक शुभेच्छा!!

दिशा लाईव्ह न्यूज.

                            खास सुविचार


शंभर मित्र मिळवणं हा कांहीं चमत्कार नाही. ...

शंभर जण आपल्या विरोधात एकत्र आले तरी.. जो आपली साथ सोडणार नाही !असा एक मित्र मिळवणं हा खरं चमत्कार आहे. 

आपलं हृदय आपल्या इतकच सुंदर असतं. ते आनंद , प्रेम , आशा - अपेक्षा आणि कृतज्ञता यासारख्या भावनांनी भरून घ्यावं आणि मग हे सौंदर्य जगामध्ये वाटून देत जावं. 

हृदय सागरा सारखं विशाल असू द्या मित्रांनो मग बघा नद्या स्वतःच भेटायला येतील!!



Post a Comment

0 Comments