Type Here to Get Search Results !

पत्रकारांनी समाज घडविण्याचे काम केले,संदीप माऊली. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत पत्रकार सन्मान सोहळा संपन्न!!


सुनील लोहार--कुऱ्हाड प्रतिनिधी.

  दिशा लाईव्ह न्यूज -:-  --दरवर्षी ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून  संपुर्ण महाराष्ट्रात व देशात साजरा केला जातो. म्हणजेच  बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म  6 जानेवारी1812 या  निमित्ताने  मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. 



या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंप्री खु.येथील सेवेकरी,व कडे वडगाव येथील संदीप पाटील  माऊली यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी 2025 या दिवशी सकाळी अकरा वाजता  पिंपळगाव हरेश्र्वर परिसरातील पत्रकार बंधूंना आमंत्रित करून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सर्वांना  शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच आठवण म्हणून  पेन व डायरी देऊन सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले . 



सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व दीप प्रज्वलन  तसेच दर्पण कार शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .

पत्रकार  हे समाजाच्या हितासाठी कार्य करत असतात समाजासाठी वेळ देतात, एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम तसेच सर्व सामान्य जनतेचे प्रश्न शासन व प्रशासन यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकार करीत असतात.पत्रकारांच्या लेखणीत अशी  ताकद असते की ज्यामुळे लोकांच्या अडीअडचणी वेळेवर सुटतात. असे प्रतिपादन कडे वडगाव येथील संदीप पाटील माऊली यांनी केले.



"आम्ही समाजासाठी चांगलंच काम करू चांगल्या लोकांना साथ देऊ" असे प्रतिपादन मुख्याध्यापक व पत्रकार उत्तमराव मनगटे सर यांनी केले 

.तर आम्हाला बोलून सन्मानित केलं आम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू असे प्रतिपादन किशोर लोहार यांनी केले. 

शेवटी पत्रकार व दिशा लाईव्ह न्युज प्रतिनिधी  सुनील लोहार यांनीही कॉपी पेस्ट पत्रकारिता न करिता आपापल्या परीने सुलेखन, निर्भीड,निःपक्ष पत्रकारित करावी  असा मोलाचा सल्ला पत्रकारांना दिला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख प्रमोद पाटील यांनी केले.  या वेळेस गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य,डॉ. दत्तु पाटील, संजय आप्पा, संजय पडोळ, दत्तू पाटील, राजू पाटील, सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments