Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ॲक्शन मोडवर वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई-- अवैध वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले!! अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी-सुज्ञ नागरिकांची मागणी.



                  सुनील लोहार  ---कुऱ्हाड प्रतिनिधी

दिशा लाईव्ह न्यूज -:-  कुऱ्हाड सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, तांडा आधी गावामध्ये आकोडे धारकांकडून वीजचोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी महावितरण वीज कंपनीकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच अनधिकृत वीज चोरीमुळे नियमित वीज ग्राहकांना याचा फटका बसत होता यामुळे गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन, ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड होणे ,फ्युज उडणे अशा बाबी नित्याने घडत होत्या. त्या अनुषंगाने आज दिनांक 9 रोजी सकाळी 11 वाजता कुऱ्हाड सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून ,  आकोडे धारकांच्या केबल वायरी जप्त  करून त्यांना दंडात्मक वीजबिल देण्यात आले .


यामुळे अवैधपणे वीज वापरण्यात येणाऱ्या लोकांमध्ये धडकी भरली असून , वीजचोरांविरुद्ध अशीच कारवाई  नियमित सुरू राहणार असल्याचे कुऱ्हाड सब स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री निसार तडवी यांनी   दिशा लाईव्ह न्यूज प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. 

 सदर कारवाई  साठी रवींद्र पाटील सहायक विद्युत अभियंता,सुरेश चौधरी सहायक अभियंता,निसार तडवी प्रभारी सहायक अभियंता कुऱ्हाड सब स्टेशन,संदीप पाटील वरिष्ठ तंत्रज्ञ, अल्केश माहोर,विद्युत सहायक,गणेश शिंदे  बाह्यस्त्रत कर्मचारी,अमोल बोरसे,अविनाश तेली या सह इतर कर्मचाऱ्यांनी केली.




Post a Comment

0 Comments