दिशा लाईव्ह न्यूज-:- पहूर , ता . जामनेर ( ता . १६ ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहुर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले .
यावेळी शिक्षक समन्वय संघातर्फे शिक्षकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढीव 20 टक्के अनुदान त्वरित प्राप्त व्हावे या मागणीचे निवेदन दिले .
या निवेदनात म्हटले आहे की , आपल्या सरकारच्या काळात शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळाच्या १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मान्यतेने १४ । १० । २०२४ रोजी वाढीव २० टक्के अनुदाना बाबत शासन निर्णय निर्गमित करून २० % , ४० % , ६० % वेतन अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व वर्ग तुकड्यांना व नव्याने पात्र ठरलेल्या शाळांना २० % अनुदान देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे .तसेच त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांनाही सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
मागील हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्णवेळ मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्यामुळे सदर बाबीसाठी पुरवणी मागणी मध्ये निधी उपलब्ध होणे क्रमप्राप्त होते .परंतु तसे झाले नाही .
तरी शासनाने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शालेय शिक्षण विभागाच्या मागणीनुसार राज्यभरातील सर्व पात्र शाळांना वाढीव २० टक्के अनुदानाचा टप्पा त्वरित मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देतेवेळी अनिल परदेशी , चंदू राजपूत , हरिभाऊ राऊत , गणेश पाटील , एस . ए . राजपूत , इब्राहिम शेख , शंकर भामेरे , प्रकाश जोशी यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होते .
Post a Comment
0 Comments