दिशा लाईव्ह न्यूज -:- .१६ येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एजुकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन आणि भव्य शेतकरी मेळावा तसेच नूतन इमारत पाया भरणी समारंभ माननीय नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे संकटमोचक मा.ना. गिरीश जी महाजन हे होते .माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तसेच संकटमोचक मा.ना. गिरीश जी महाजन यांना चांदीची ‘गदा’ प्रदान करून गौरवण्यात आले.माननीय नामदार गुलाबभाऊ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तलवार भेट देऊन गौरवण्यात आले॰आलेल्या मान्यवरांचा सहर्ष यथोचित सन्मान-सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्वागत मनोगतातून संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी गरुड म्हणाले की मुख्यमंत्री महोदय, आपण महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय तरुण तडफदार आणि अत्यंत कार्य कुशल मुख्यमंत्री आहात आपण लाडक्या बहिण योजनेमुळे गेमचेंजर म्हणून देवाभाऊ असा आपला उल्लेख केला जातो.
मी संस्था परिवाराच्यावतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो ...ना. गिरीश महाजन यांचा शेंदुर्णी गावाचा आणि तालुक्याचा आपण कायापालट केला. सर्व धार्मिक स्थळे पर्यटन विकासाच्या माध्यमातून सुंदर बनवले. रस्ते तयार केले. स्वच्छ पाणी आपण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सगळ्या भागात आपण पोहोचवित आहात. कधी नाही तो एवढा विकास आजआपणाला सर्वत्र दिसत आहे.
तापी- वाघुरचे पाणी आपण सगळ्या गावागावात पोहचवून शेतीला सिंचन सुविधा देत आहात. सुशोभीकरण, औद्योगिक विकास ,आरोग्याचा विकास, शिक्षणाचा विकास, विमानतळाचा विस्तार, जलसंधारण इत्यादी क्षेत्रात आपण भरीव कामगिरी केली आहे. असे सांगत त्यांनी मनोगतातून गौरव केला.मान्यवरांच्या हस्ते अमृत गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
शाळेच्या भव्य नूतन इमारतीसाठीचे पायाभरणी -पूजन करण्यात आले.मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी संस्थेच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला.उद्घाटनपर भाषणातून शेती -वीज या संदर्भातील समस्या तत्काळ सोडविल्या जातील कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच शेतकर्याचा माल हमीभाव देऊन खरेदी केला जाईल असे स्पष्ट केले.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे,खा. स्मिता ताई वाघ,आ.मा.संजयजी कुटे,आ. चंद्रकांत सोनवणे,आ.मंगेश चव्हाण,आ.अमोलजी पाटील,आ.राजुमामा भोळे, डॉ.उल्हास पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंदजी अग्रवाल,संस्थेचे उपाध्यक्ष भीमाराव शेळके, सहसचिव यू.यू. पाटील ,संचालक किशोर दादा पाटील कार्यालयीन सचिव दीपकजी गरुड,संचालिका उज्वलाताई काशीद,वसतिगृह सचिव गो.गो. सूर्यवंशी, सौ.सरोजिनी ताई गरुड,सुधाकर आण्णा बारी,शांताराम बापू गुजर, डॉ.सागरजी गरुड, जळगाव जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी साहेब,शेंदुर्णी नगरपंचायतचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, सर्व मान्यवर, स्थानिक मान्यवर, पत्रकार बंधू, ई- मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परिसरातील नागरिक ,शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री. पी.जी. पाटील व डॉ. योगिता चौधरी यांनी तर आभार संस्थेचे सचिव श्री सागरमलजी जैन यांनी मानले.
Post a Comment
0 Comments