दिशा लाईव्ह न्यूज -:- भडगाव तालुक्यातील लोन पिराचे येथे भव्य दिव्य 33 kv चे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे सब स्टेशन आहे, परिसरातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याचा आरोप येथील मगरूर अधिकारी व कामचुकार कर्मचाऱ्यांवर नेहमीच होत असतोच, यातच भर म्हणून नेहमीच या ठिकाणी कार्यालयीन वेळेतच दारू, बकरा पार्ट्यांसह, महफिल रंगत असते,
तर एका खोलीमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी दारूसह महफिल रंगवत असताना आढळले,
संबंधितानी प्रतिनिधीला पाहताच दारूच्या बाटल्या अन मटणाचा कुकर घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला, हे सर्व ट्रेन लाईन न्यूज च्या कॅमेरात कैद झाले असून ऑफिस कामकाजाच्या वेळेत अशा मेहफिली रंगवीणे योग्य की अयोग्य?
येथील या मुजोर अधिकारी व कामचूकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?यामुळे लोन पिराचे गावासह भडगांव तालुक्याचे खराब होत असलेले नाव दुरुस्त होणार? ही सर्वच चिंतेची बाब असून, आजच्या या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठांतर्फे होऊन या मुजोर अधिकारी व कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी! अशी चर्चा परिसरात सुरू झाली असून या पार्ट्याखोऱ्यांवर काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे,
तसेच लोन पिराचे सब स्टेशनला अशा दारु मैफिला नेहमीच रंगत असल्याने गावाचे नाव खराब होत असल्याने याबत लवकरच आक्रमक पवित्रा घेऊ असे लोण पिराचे येथील सुज्ञ नागरिकांनी ट्रेन लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले आहे...
या मैफिल रंगवणाऱ्यांवर, पार्टीखोऱ्यांवर, कार्यालयीन वेळेत बकराखाणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी लोन पिराचे येथील व परिसरातील तालुक्यातील कोणते सुज्ञ नागरिक प्रयत्न करतात? तसेच या प्रकाराची सखोल चौकशी होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होते की यांची फक्त बदली करून गंभीर प्रकरण दाबण्यात येते का याकडे देखील ट्रेन लाईव्ह न्यूजचे विशेष लक्ष असणार आहे.
Post a Comment
0 Comments