Type Here to Get Search Results !

पहूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी फुलला मंदिर परिसर यात्रोत्सवाचा भाविकांनी घेतला लाभ



दिशा लाईव्ह न्यूज , पहूर , ता . जामनेर ( सौ . गीता भामेरे)  जामनेर तालुक्यातील पहुर येथे शेंदुर्णी मार्गावर देवळी गोगडी नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला .


स्वराज्य ग्रुप तर्फे फराळ , चहा  , पाणी वाटप करण्यात आले.स्वराज्य ग्रुपचे विशाल चौधरी , मुन्ना चौधरी , देवानंद धनगर , महेश सोनवणे , संतोष माळी , समाधान उबाळे , निलेश घोंगडे , ईश्वर सोनवणे , गणेश घोंगडे आदींचे सहकार्य लाभले.

        ह भ प उखाजी महाराज , मुक्ताईनगर यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय शिवमहापुराण कथेचे भाविकांनी श्रवण केले . 

रात्री ह भ प विष्णुदास महाराज चिंचखेडेकर यांचे कीर्तन झाले . 

पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी श्रीफळ देऊन स्वागत केले .पोलीस उपनिरीक्षक  भरत दाते यांच्या हस्ते महादेवाला सपत्नीक जलाभिषेक करण्यात आला . यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रदीप लोढा , विश्वस्त किशोर बनकर यांची उपस्थिती होती . पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी  चोख बंदोबस्त ठेवला होता . 

यात्रोत्सवाला प्रतिसाद

     छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यात्रा भरली . पूजेचे साहित्य , प्रसाद , खेळणी , शीतपेयांची दुकाने यात्रेत आलेली होती . सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी मंदिरात येत होते . भजनी मंडळ , महिला साधक , सुरेश राऊत , ईश्वर हिवाळे , संभाजी देशमुख , निळकंठ महाराज , गोकुळ सोनवणे यांच्यासह  भाविकांचे सहकार्य लाभले .




Post a Comment

0 Comments