Type Here to Get Search Results !

पहुर येथे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात स्वराज्य ग्रुप तर्फे फराळ वाटप


दिशा लाईव्ह न्युज , पहूर , ता . जामनेर ( सौ .गीता भामेरे) येथील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचे औचित्य साधून स्वराज्य ग्रुप तर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले .

         महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांच्या मांदियाळीने चैतन्य निर्माण झाले आहे .

         स्वराज्य ग्रुप पहुर तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले . स्वराज्य ग्रुपचे विशाल चौधरी , मुन्ना चौधरी , देवानंद धनगर , महेश सोनवणे , संतोष माळी , समाधान उबाळे , निलेश घोंगडे , ईश्वर सोनवणे , गणेश घोंगडे आदींचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments