दिशा लाईव्ह न्यूज--पहुर , ता .जामनेर ( सौ .गीता भामेरे ) जामनेर तालुक्यातील वडाळी शिवारात मध्यरात्री बिबट्याने रोह्याचा फडशा पाडला असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . शेतकऱ्यांनी भयभीत न होता शेत शिवारात एकटे जाण्याचे टाळावे , तसेच लहान बालकांना सोबत नेऊ नये आवाहन सरपंच संजय बनसोडे यांनी केले आहे .
दिशा लाईव्ह न्यूजने वन विभागाचे श्री धनवटे यांच्याशी संपर्क करून माहिती जाणून घेतली . शाहरुख शेख रा . वाकोद यांच्या हरी नगर शिवारात असलेल्या मक्याच्या शेतात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने रोहीचा फडशा पाडला आहे .
वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांसह शेतकरी बांधवांनी केली आहे .
Post a Comment
0 Comments