Type Here to Get Search Results !

पहूर येथे आज महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सव ! श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसर यात्रेसाठी सज्ज !



 दिशा लाईव्ह न्यूज --पहूर , ता . जामनेर (  सौ.गीता भामेरे )

 जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर -शेंदुर्णी मार्गावर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर  वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .

श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर पंचक्रोशीतील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून जागृत देवस्थान आहे .मंदिराच्या जिर्णोद्धार आणि परिसर विकासासाठी शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या अथक परिश्रमातून भाविकांच्या सहकार्याने ट्रस्टच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत . 

      २२ फेब्रुवारी पासून येथे संगीतमय शिवमहापुराण कथेसह अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास  मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे .  आज बुधवारी ( ता . २६ ) महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे  छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर  यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

            परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी आजन्म भिक्षा झोळी संकल्पक शिवभक्त रंगनाथ महाराज , ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्यासह विश्वस्त मंडळांने केले आहे  .

Post a Comment

0 Comments