Type Here to Get Search Results !

दुःखद बातमी----मेणगाव येथील गयाबाई पांडुरंग पडोळ यांच वृद्धपकाळाने निधन-- आज सकाळी 10 वाजता निघणार राहत्या घरून अंत्ययात्रा.



दिशा लाईव्ह न्यूज -:-   मेणगाव,ता.जामनेर येथील सामाजिक कार्यकर्ते  देविदास, रमेश, तथा, मधुकरभाऊ पांडुरंग पडोळ यां तिन्ही पुत्रांची आई गं.भा. गयाबाई पांडुरंग पडोळ 

यांचे काल  दिनांक 16. 3. 2025 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजून 40 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले..

योगायोग असा की आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज आहे

आणि अशा या पुण्य पर्वात या नश्वर जगातील कार्य आटोपून या नश्वर देहाला आयुज्य मुक्तीत परावर्तित करणे इतके सोपे नसते.. त्या मागे अनंत प्रेम वात्सल्य या जगाला अर्पण करावे लागते, आपले जीवन यथार्थ वेचून वैकुंठ गमन करणारी ही आई अतिशय कष्टाळू, प्रेमळ, स्वभावाने परिपूर्ण होती,

आज खर्या अर्थाने वैकुंठ वासी झाली..


या मात्रुवत आईची अंतिम यात्रा उद्या सकाळी दिनांक 17, 3, 2025 रोजी ठीक 10 वाजता मेणगाँव येथून मधुकर भाऊ पडोळ 

यांच्या घरून निघणार आहे..

आई महालक्ष्मी आईला तिच्या कुशीत जागा देवो हीच आईच्या आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना.

Post a Comment

0 Comments