दिशा लाईव्ह न्यूज --::-- राष्ट्रीय शिक्षक संचेतना उज्जैन मध्य प्रदेश व चॉईस कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स पुणे महाराष्ट्र व हिंदी प्रचार प्रसार साठी विश्व नेटवर्क या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधून लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रहितासाठी समाज साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी अमूल्य सेवा प्रदान केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील लोकमाता अहिल्याबाई नारी शक्ती सन्मान तसेच शिक्षण, सामाजिक, कार्य, कला, साहित्य आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण करून असाधारण योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील श्रेष्ठ नारी सन्मान असे दोन्ही सन्मान स्वरूपात प्रमाणपत्र, प्रतीक चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षक संचेतना उज्जैनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. प्रभू चौधरी, दक्षिण भारत प्रचार प्रसार सभेचे अध्यक्ष श्री चवाकुल राम कृष्णराव, राजभाषा हिंदी सलाहकार समिती प्रमुख डॉ वीरेंद्र यादव, तसेच साहित्यकार नितू सिंग, कर्नाटक हून डॉ अरुणा हिरेमठ, राष्ट्रीय मुख्य संयोजक डॉ सुवर्णा जाधव, राष्ट्रीय म हासचिव डॉ शहनाज शेख, डॉ निर्मला सिंग राजपूत, आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून तेली समाज महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेश कार्याध्यक्ष अनिता राजेंद्र चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सीए डॉ प्रवीण पाटील, सचिव सौ. श्यामलताई पत्की, सहसचिव अॅड. प्रफुल्ल अग्रवाल, सीडीसीचे अध्यक्ष दीपनाथ पत्की व कार्यकारणीतील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.
तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्र. प्राचार्य डॉ. एल.पी. शिंदे, पर्यवेक्षक प्रा. आर. एम. मुळे, डॉ. सौ. विभाती कुलकर्णी, उप प्राचार्य व कार्यकारणी सदस्य प्रा.ई.एम. खिल्लारे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, यांनी उपस्थित राहून अनिता राजेंद्र चौधरी यांचे अभिनंदन करून महाविद्यालयात सन्मानित करण्यात आले.
Post a Comment
0 Comments