दिशा लाईव्ह न्युज , पहूर , ता . जामनेर ( सौ . गीता भामेरे ) ( ता . ११ ). मा .महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व मा. जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील रेल्वे मार्ग भूसंपादन प्रस्तावावर बैठक मंत्रालयात पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांनी सादरीकरणाद्वारे प्रस्तावाची सविस्तर माहिती दिली.
प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया
रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाची भूमिका
प्रभावित भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे
नवीन रेल्वे मार्गामुळे जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल व आर्थिक विकासाला गती मिळेल!
पहूर मार्गे जाणाऱ्या जालना लोहमार्ग अंतर्गत शेतकरी बांधवांना येणाऱ्या विविध अडचणींविषयी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी उपस्थित बैठकीमध्ये मंत्र्यांचे लक्ष वेधले .
Post a Comment
0 Comments