दिशा लाईव्ह न्यूज --::-- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी यांच्या अंतर्गत मुंबई येथिल यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात अ र भा गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे वाणिज्य शाखेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. योगिता चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षभर केलेले उत्कृष्ट कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा. उदयजी सामंत,उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती होती. समवेत मा मितेश घट्टी पोलीस उपयुक्त, मुंबई वाहतूक, मा डॉ. नामदेव भोसले संचालक मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन, मा. प्रफुल्ल पाठक, दिल्ली, मा. प्रशांत शितोळे, श्री आनंद गानू, मा सोनाली लोहार ओडियो लॉजिस्ट, समवेत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या पुरस्कारासाठी मॅडम यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ .योगिता पांडुरंग चौधरी यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हाईस चेअरमन मा. भीमराव शामराव शेळके, सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव मा. दादासाहेब यु. यु.पाटील , संस्थेचे कार्यालयीन सचिव मा.भाऊसाहेब दीपकजी काशिनाथराव गरुड , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच सर्व संस्था परिवार यांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments