Type Here to Get Search Results !

गावनकाशावरील शिव पानंद शेतरस्त्यांच्या राज्यात सरसकट हद्द निश्चिती करणार-डॉ. सुहास दिवसे(जमाबंदीआयुक्त तथा संचालक,भुमिअभिलेख,महाराष्ट्र राज्य) शेत तिथे रस्ता,गाव तिथे समृद्धीसाठी भुमिअभिलेख विभागाची भुमिका महत्वपूर्ण- शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील ( महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ) जमाबंदी आयुक्तांना राज्यातील शेतस्त्यांच्या गंभीर प्रश्नांसंदर्भात चळवळीचे निवेदन!!


                        स्पेशल रिपोर्ट


दिशा लाईव्ह न्यूज   -:- (कृष्णा पाटील, तोरणाळा )    राज्यात दिवसेंदिवस शेतरस्त्यांच्या प्रश्नामुळे शेतजमीन पडीक पडत असुन अनेक शेतकरी फौजदारी स्वरूपांच्या घटनांमध्ये अडकत असुन वर्षानुवर्ष नव्हे तर पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष सुरूच आहे.

 शासन निर्णय बनतात त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष मात्र होताना दिसत नाही .महामार्गा एवढेच शेतरस्त्यांना महत्व असुन शेतरस्ता हा शेतीचा श्वास असुन समृद्ध शेतकरी बनला तर समृद्ध महाराष्ट्राच स्वप्न पूर्ण करता येईल .शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे तो शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायांसाठी शेतात वास्तव्यास आहे.



 शेतीसाठी आधुनिक यंत्रसामुग्रीच्या दळणवळणाची अत्यंत आवश्यक्ता निर्माण झाली असुन तुकडेवारी,भाऊ हिस्सेदारी, वाटपत्रा नंतर शेतरस्त्यांचा प्रश्न गंभिर बनत चालला असुन यासाठी ब्रिटिशकालिन शिव पानंद शेतरस्त्यांना तातडीने खुले करून हद्द निश्चिती करण्यासाठी शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेत शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी डॉ.सुहास दिवसे जमाबंदी आयुक्त तथा संचालक भुमिअभिलेख महाराष्ट्र राज्य यांच्याकडे शिव पानंद शेत रस्त्यांना नंबरी लावून त्यांचे विशिष्ट कालावधी (मुदतीत) सातत्याने सर्वेक्षण सुरू करून नंबरी हटवणारांना दंड सुरू करावा,पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेसह इतर शासनिर्णयात निशुल्क मोजणी असताना, तालुका भुमिअभिलेखने आकारलेले सर्व शुल्क व्याजासह शेतकऱ्यांना  वापस द्यावे,



अतिक्रमित शासकीय शिव पानंद शेतरस्त्यांची कोणीही तक्रार दाखल केल्यास तातडीने त्यावर कार्यवाही करावी,शासकीय अधिकाऱ्यांनीच शासकीय शेतरस्ता केसेस चालवाव्यात,शासकीय शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीनंतर अपिलाचा अधिकार नसावा,राज्यातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांच्या अतितातडीच्या मोजण्या विहीत कालाधीत (मुदतीत) पुर्ण करा, गावनकाशावरील सर्व बंद शेतरस्त्यांचा अहवाल घेवून तातडीने तालुका प्रशासनाला बंद रस्ते चालु करण्याचे आदेश द्यावेत!! त्याचबरोबर गाव नकाशावरील शेतरस्त्यांच्या लांबी रुंदी नकाशावर नमुद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

 सदर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढची नियोजीत दिशा लवकरच चळवळीच्या वतीने ठरवण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे दादासाहेब जंगले पाटील यांनी दिशा लाईव्ह न्यूजशी बोलतांना  सांगितले.



Post a Comment

0 Comments