दिशा लाईव्ह न्यूज -:- आज दि.१०/०३/२०२५ (सोमवार) रोजी पाळधी ता.जामनेर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक जळगाव जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे आणि जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
जामनेर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा निसटता पराभव झाला. त्यानंतर आता येणाऱ्या जि.प. , पं.स , नगरपालिका निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी बोलतांना जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांना कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत सुक्ष्म नियोजनाने तयारीला लागा अशा सुचना दिल्या.तुमच्यावर उद्भवणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीत तुमच्या पाठीशी संपुर्ण पक्षाची ताकद उभी करण्याची जबाबदारी माझी असेल अशा शब्दात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यासोबतच जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे यांनी पक्ष वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बैठकीला डिगंबर पाटील,दिलिप खोडपे,डॉ.मनोहर पाटील,किशोर पाटील,डॉ.प्रशांत पाटील,रमेश पांढरे,भास्करराव पाटील,दिलिप पाटील,नाना पाटील,रोहन राठोड,आबासाहेब चौधरी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येत उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन विश्वजित पाटील यांनी केले तर आभार नंदु ईंगळे यांनी मांनले.
Post a Comment
0 Comments