Type Here to Get Search Results !

शेंदूर्णी येथील गरुड महाविद्यालयात रंगला ५२ वर्षांनंतर वर्ग मित्रांचे स्नेह मिलन!! अनेक वर्षांनी भेटताच अनेकांचा आला कंठ दाटून.


 दिशा लाईव्ह न्यूज  --::--  जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील आधीचे न्यु.इंग्लिश स्कुल व आताचे आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयात १९७२-७३ या जुन्या अकरावीच्या (११ वी) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय गरुड तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा.जिल्हा परिषदेच्या सदसूसौ.सरोजिनी गरुड उपस्थित होत्या.


प्रथम सगळ्यांचे भगवे फेटे  बांधुन स्वागत करण्यात आले.आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच  सरस्वती देवी,प.पु.हरिप्रसाद महाराज, अण्णासाहेब भास्करराव गरुड व मान्यवरांच्या प्रतिमेचे पुजन यावेळी करण्यात आले.मेळाव्याची सुरुवात त्यावेळच्या शाळेतील प्रार्थनेने झाली.आपल्या सोबतीला असणारे काही मित्र मैत्रिणी  शिक्षक हे दिवंगत झालेले आहे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व सहभागी सर्व वर्गातील मित्र मैत्रिणी यांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक व सुत्रसंचलन सौ.कुमुदिनी उर्फ (मीराताई )मोरे यांनी केले.माहेरी आल्याचा तर आनंद आहे सोबतच ५२ वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत आल्यावर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचे सांगितले त्यांनी स्व.बापुसाहेब गरुड, शेंदुर्णी गावावर व या स्नेहमिलनावर आधारित आपल्या स्वरचित कविता सादर केल्या होत्या.

शिवराम महाले व गोविंद अग्रवाल यांनी या स्नेह मिलन सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता वर्ग मित्रांच्या वतीने प्रा.डॉ.श्रीराम निकम यांनी त्यांचा सत्कार केला.


सर्व माजी विद्यार्थी यांनी आपला परिचय करून देत असताना शाळेचे शिक्षकांचे व संस्थेचे उपकार असल्याचे सांगत आभार मानले.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात गोविंद अग्रवाल यांनी आपल्या शाळेतील अनुभव विषद करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.आमच्या या बॅचच्या वतीने लवकरच शाळेत शुद्ध पाण्याची सुविधा असणारे मशिन बसवुन देण्याचे सर्वानुमते जाहीर केले.सगळ्यांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देत असतांनाच अनेकांचा कंठ दाटुन आला होता.भारत भरातुन विविध शहरांमध्ये असणारे मित्र मैत्रिणी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी सांगितले की हा मेळावा खुप जुन्या बॅचचा आहे.शाळा संस्था गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण व सोबत वस्तीगृह सुद्धा चालवत आहे.दोन वर्षात आपल्या शाळेच्या आवारातच महाराष्ट्रातील अत्याधुनिक अशी तीन मजली सर्व सुविधायुक्त पर्यावरणपुरक सुसज्ज इमारत बांधली जात आहे.शाळेसाठी विद्यार्थी माजी विद्यार्थी हे भुषण असल्याचे सांगितले व आपली शाळा आहे तेव्हा आपल्या परीने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक गोविंद अग्रवाल यांनी तर सूत्रसंचालन सौ.कुमुदिनी मोरे व आभार शिवराम महाले यांनी मानले.कार्यक्रमाच्या नंतर गोविंद अग्रवाल यांच्या जिनमध्ये स्नेह भोजनाचा सगळ्यांनी आस्वाद घेतला.


दिशा लाईव्ह न्यूज.

सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट बातम्यांसाठी....

28 वर्षांपासून पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव!!

Post a Comment

0 Comments