दिशा लाईव्ह न्यूज-लोहारा.-:- पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील जेष्ठ पत्रकार मा. श्री. रवीशंकर पांडे व पिंपळगाव हरेश्वर पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिनी स्व. सरोजिनी रवीशंकर पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम आज दिनांक १० मार्च २०२५ सोमवार रोजी वरखेडी येथील प्याराबाई धनराज बडोला माध्यमिक विद्यालयात पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम वरखेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमात कर्तृत्ववान सत्कारमूर्ती ॲड सौ. कविता रायसाकडा (मासरे), सरपंच सौ. सविता सोनवणे(पाटिल), उपशिक्षिका श्रीमती एस. डी. सूर्यवंशी, श्रीमती मीनाक्षी अहिरे, मुख्याध्यापिका सौ. उर्मिला पाटील, उपशिक्षिका आयशा बेगम शेख हुसेन, वैद्यकीय क्षेत्रातील वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, श्रीमती एस. ए. भामरे, आशा गटप्रवक्त सौ. शोभा पाटील, बचत गटाच्या श्रीमती वनिता शिंदे, सफाई कामगार सौ. मंदाकिनी उज्जैनवाल, कुमारी चेतना हिरे, श्रीमती बिलकीस जान मुसीर शेख, श्रीमती पि. डी. सोमवंशी, एम. जे. राठोड व संगीता कराळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार रविशंकर पांडे, दिलीप जैन, हेमशंकर तिवारी, सतीश गोपाळ, सुनील लोहार, चंद्रकांत माहोर, दीपक मुलमुले, गजानन लाधे, भालचंद्र राजपूत, ईसाक तडवी, विजय राजपूत, शाळेचे मुख्याध्यापक पि. आर. गरुड सर पर्यवेक्षक जे. एस. जुबंळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. चेतना हिरे व तडवी सर यांनी केले तर प्रस्ताविक पत्रकार रविशंकर पांडे तर आभार मुख्याध्यापक पि आर गरुड सर यांनी केले.
Post a Comment
0 Comments