Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्य स्तरीय अधिवेशन राजवड येथे संपन्न ८२ रणरागिनींचा राष्ट्रीय प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या हस्ते केला सन्मान



दिशा लाईव्ह न्यूज , (सौ . गीता भामेरे )पहूर , ता . जामनेर 

पारोळा तालुक्यातील राजवड येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्य स्तरीय अधिवेशन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले .

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या राष्ट्रीय संघटनेतर्फे दोन दिवशीय राज्य स्तरीय अधिवेशन ८ व ९ मार्च रोजी जळगाव जिल्हयातील राजवड येथील शबरी फॉर्म येथे सुरुवात झाले. 

प्रथम सत्राची सुरुवात दिप प्रज्वलनाने व महिला रॅलीने झाली तर द्वितीय सत्रात रणरागिनीना शहिद भगतसिंग विर योद्धा पुरस्काराने महिलांना खंडापूरकर बाबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले..

 .जळगाव जिल्ह्यातील आदर्श गाव राजवड ता पारोळा येथे महिला दिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या राष्ट्रीय संघटनेतर्फे दोन दिवशीय राज्य स्तरीय अधिवेशन ८ व ९ मार्च रोजी राज्यस्तरीय अधिवेशन उद्घाटन शुभहस्ते कृषीभुषण.साहेबराव धोंडू पाटील, माजी आमदार अमळनेर विधानसभा यांच्या हस्ते व सौ. पुष्पलता साहेबराव पाटील. लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. या प्रसंगी प्रदिप पाटील खंडापुरकर (बाबा)राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन हे उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगवान आसाराम महाजन, अरुण देशमुख, पुष्पलता पाटील सरपंच राजवड स्वागताध्यक्ष अॅड.राणीताई स्वामी (महिला प्रदेशाध्यक्षा) श्रीमती. सोनलताई पाटील (शमहिला जिल्हाध्यक्षा, जळगांव श्रीमती. सनाताई शेख युवती प्रदेशाध्यक्षा, सौ निर्मलाताई बुल्हे,सारिकाताई नागरे महिला प्रदेश सरचिटणीस, भाग्यश्री पाटील पत्रकार,अमोल भागवत, बाबुराव क्षेत्रे, गणेश घाडगे, हितेश दाभाडे, पंडीत तिडके, अमोलोसिंग नागी अनिल देसले, महेश पाटील, उल्हास पाटील, वसंत देशमुख, राहुल पाटील दादासाहेब काळे, फेरोज शेख संपादक, शिवव्याख्याते प्रदीप जगताप पाटील, विनोद जगताप, सुनील उंबरकर, मुरलीधर विठ्ठल दाभाडे, शंकर भामेरे, ईश्वर हिवाळे,गिता शंकर भामेरे पहूर, गजानन काळे जिल्हा अध्यक्ष शिवणा, प्रवीण ठाकरे अजिंठा,मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत सोयगाव, गितेश दाभाडे येवला,दिलीप देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष,दत्तु शिंदे 'सचिन खंडागळे यांची यावेळी उपस्थिति होती. या प्रसंगी महिला रॅली काढून महिलांचा यावेळी सन्मान सोहळा संपन्न झाला हे राज्यस्तरीय अधिवेशन २ दिवस चालणार आहे.

 यावेळी माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील अमळनेर, राणीताई स्वामी, भगवान महाजन प्रदिप बाबा खंडापुर यांनी मार्गदर्शन केले द्वितीय सत्रात कतृत्ववान रणरागिनीना शहिद भगतसिंग विर योद्धा पुरस्काराने ८२ महिलांना राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर व अँड राणीताई स्वामी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

रात्री संगीत रजणी या देश भक्ती गितांचा सदाबहार गिताचा कार्यक्रम संपन्न झाला ९ मार्च दुपार नंतर या अधिवेशनाचा समारोप मोठ्या थाटामाटात संपन्न झाले असल्याचे माहिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळ सिंग राजपूत यांनी बोलताना सांगितली.



Post a Comment

0 Comments