लोहारा , ता . पाचोरा ( दिनेश चौधरी ) दिशा न्यूज लाईव्हच्या नवनियुक्त प्रतिनिधी , अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पहूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा ज्ञानवेद प्रबोधिनीच्या संस्थापक संचालिका सौ . गीता शंकर भामेरे यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा तथा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड . राणी स्वामी यांच्या हस्ते शहीद भगतसिंग योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला .
पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथील शबरी फार्म मध्ये दि .८ व ९ मार्च रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले . यात पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केलेल्या सौ . गीता भामेरे यांना जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले . त्यांच्या या यशाबद्दल विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत , द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी , भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका उपाध्यक्ष ईश्वर हिवाळे , शहराध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज आदींनी अभिनंदन केले आहे .
Post a Comment
0 Comments