दिशा लाईव्ह न्यूज , (सौ . गीता भामेरे ), पहूर , ता.जामनेर ( ता . ८) मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून आमिष दाखवून पहूर पेठ येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील यांना दोन जणांनी दहा लाखांचा गंडा घातला असून याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे तर दुसरा मात्र फरारच आहे.
जितेंद्र भागवत थाटे वय ३५ राहणार विवेकानंद नगर जळगाव, तुषार दीपक गावंडे वय ३० राहणार गिरजा कॉलनी जामनेर या दोघांविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार गावंडे यास अटक करण्यात आली असून दुसरा मात्र फरारी आहे.
याबाबत पहूर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पहूर येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील हे आपल्या परिवारासह राहत आहे. त्यांची मुलगी रेल्वेच्या परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती गजानन पाटील यांच्या पत्नीच्या कार्यालयात ज्ञानेश्वर तुकाराम महाले नोकरीला आहेत यांच्यासोबत मुलीच्या नोकरीची चर्चा झाली असता ,त्यांनी रेल्वेत नोकरीला लावून देणाऱ्या वरील दोघांची माहिती दिली.
गजानन पाटील व त्यांची पत्नी दोघेही या युवकांना भेटले त्यांनी नोकरी लावून देतो असे सांगत रेल्वे विभागात आमची पक्की ओळख असल्याचे गजानन पाटील यांना सांगितले इतर युवकांच्या नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र त्यांनी यावेळी दाखविले.
गजानन तुळशीराम पाटील यांनी बँक खात्यातून 12 ऑक्टोबर 2022 ते 10 मार्च 2023 पर्यंत दहा लाख रुपये या संशयितांना दिले परंतु दोन वर्षे उलटूनही अद्याप पर्यंत नियुक्तीपत्र न मिळाल्याने किंवा नियुक्तीपत्र मिळत नसल्याने गजानन पाटील यांनी युवकांकडे तगादा लावताच संशयितांकडून मात्र उडवाउडवीची उत्तर मिळत होते. जितेंद्र ताटे व तुषार गावंडे यांनी त्यांचे धनादेश दिले मात्र बँकेत धनादेश वटले नाही. त्यावेळी पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पहूर पोलीस स्टेशनला वरील दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरीचे आमिष दाखविणारा अजूनही फरारच
दरम्यान सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालून फसवणारा जितेंद्र भागवत थाटे याच्या विरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटली असून तरीही आरोपी फरारच असल्याने व योग्य न्याय न मिळत असल्याने सुशिक्षित बेरोजगार आंदोलनाच्या तयारीत आहेत.
या फसवणूक प्रकरणात जितेंद्र थाटे हा मास्टरमाइंड असून गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटूनही अद्याप पर्यंत तो फरारच आहे.त्यास लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान एका मुलीला नोकरी लावून देत असल्याचे सांगून दहा लाखात आणि एका तरुणाला संरक्षण खात्यात नोकरीचे आमिष दाखवून सोळा लाखांत या ठगबाजाने फसवणूक केली आहे.
पहूर पोलीस जितेंद्र थाटे यांच्या शोध घेत असून यासाठी वेळप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाईल असे तपास अधिकारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांनी सांगितले आहे.
दरम्यान या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या जितेंद्र थाटे याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यास अटक करण्यात यावी. व आम्हास न्याय मिळवून देण्यात यावा अशी विनंती फसवणूक झालेले गजानन तुळशीराम पाटील यांनी केली आहे.
ठगांवर विश्वास ठेवू नका -
नोकरीचे अमीष दाखविणे , लॉटरी लागल्याचे कळविणे , घरबरल्या पैसे कमविण्याचे फंडे सांगणारे ठग गंडविणारे असण्याची शक्यता जास्त असते , अशा वेळी थेट पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन दिशा लाईव्ह न्यूज सर्व वाचक तसेच जनतेस करीत आहे .
Post a Comment
0 Comments