Type Here to Get Search Results !

देऊळगाव गुजरी येथे दोन गटात हाणामारी; २६ जणांवर गुन्हा दाखल!!


दिशान्यूज लाईव्ह--::--कृष्णा पाटील ,  तोरणाळे.

देऊळगाव गुजरी येथे दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली त्यात चाकू, सुरी, फायटर, व लोखंडे टामी अशा हत्यारांचा वापर करण्यात आल्याने दोघे गटातील -६ जण गंभीर जखमी झालेले आहेत .

या प्रकरणी दोघे गटाने एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. दोघे गटातील एकूण -२६ आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देऊळगाव गुजरी येथे दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीतील एका गटातील फिर्यादी यासीन चॉंद पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी यासीन पिंजारी याचा भाऊ रशीद चॉंद पिंजारी याला गावातील जाकीर कालू कुरेशी व शाकीर कालू कुरेशी यांनी मटणाचे-४०० रुपये मागितले. तेव्हा रशीद पिंजारी याने तुमचे पैसे दोन दिवसानंतर देईल असे सांगितले व घरी निघून आला. 

या कारणावरून आरोपी जाकीर कालू कुरेशी, शाकीर कालू कुरेशी, जफर कालू कुरेशी, नसीम लाला कुरेशी, खलील लाला कुरेशी, कालू लाला कुरेशी, एजाज खलील कुरेशी, अरबाज कदीर कुरेशी, मासूम लाला कुरेशी, भुऱ्या लाला कुरेशी, सोनू रशीद कुरेशी, रशीद रफिक कुरेशी सर्व रा. देऊळगाव गुजरी यांनी संगमने जमाव करून हातात सुरी, फायटर, लोखंडी टामी असे हत्यारे घेऊन फिर्यादीच्या घरी पिंजारी गलित आले आणि यातील आरोपी खलील कुरेशी याने फिर्यादी यासीन पिंजारी यांच्या तोंडावर फायटर मारून त्यास दुखापत केली.

 भाऊ रशीद पिंजारी यास जफर कुरेशी याने डोक्यात लोखंडी सूरी मारून गंभीर दुखापत केली तसेच फिर्यादीची पत्नी साजिदाबी व भावाच्या पत्नीच्या गळ्यातील पोत भांडणात तोडून नुकसान केले व रिक्षा क्रमांक एम एच-२८ ए. बी-५०२० वाहनाचे दगड मारून काचा फोडल्या तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी दिली यात फिर्यादी यासीन पिंजारी व त्यांचा भाऊ रशीद पिंजारी जखमी झालेले असून याप्रकरणी फिर्यादी यासीन पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस स्टेशनला एकूण बारा आरोपींच्या विरोधात गु.र.नं.-२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५(२),११८(१),३२४(४),१८९(२),१९१(२),१९१(३),३५१(२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतचा पुढील तपास सहा. पो. नि. गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गणी तडवी हे करीत आहे.

दुसऱ्या गटातील फिर्यादी शाकीर कालू कुरेशी यांच्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे शाकीर कुरेशी याने घर बांधणीसाठी लागणारे लाकडी सेंट्रींग साहित्य गावातील रशीद चॉंद पिंजारी यांच्याकडून भाड्याने आणले होते.

 याच सेंट्रींगचे भाड्याचे पैसे फिर्यादी शाकीर याने रशीद पिंजारी यास दिले नाही याचा राग आल्याने व याच कारणावरून आरोपी रशीद चॉंद पिंजारी, निसार चॉंद पिंजारी, यासीन चॉंद पिंजारी, अरमान चॉंद पिंजारी, सलमान चॉंद पिंजारी, अलमा चॉंद पिंजारी, शाहीन अमन पिंजारी, शंभो मुसा पिंजारी, गुड्डू मुसा पिंजारी, शानुर मुसा पिंजारी, बबलू अमन पिंजारी, रहीम शकील पिंजारी, सज्जो यासीन पिंजारी, हिना रशीद पिंजारी, सर्व रा. देऊळगाव गुजरी यांनी एकत्रित येऊन रशीद पिंजारी याने फिर्यादी शाकीर कुरेशी यांच्या डोक्यात लोखंडी टामी मारून गंभीर दुखापत केली निसार पिंजारी याने फिर्यादीस मारहाण केली.

 भाऊ जफर कुरेशी यास निसार पिंजारी याने पोटावर चावा घेऊन दुखापत केली. चुलत भाऊ एजाज कुरेशी यास यासीन पिंजारी याने हातावर चाकू मारून दुखापत केली तर दुसरा भाऊ जाकीर कुरेशी यास आरमान व सलमान यांनी मारहाण केली तसेच फिर्यादीचे आई-वडील यांना आठ ते नऊ जणांनी मारहाण केली. या हाणामारीत फिर्यादी शाकीर कुरेशी, एजाज कुरेशी, जफर कुरेशी व जाकीर कुरेशी असे चार जण जखमी झालेले आहेत.

याप्रकरणी फिर्यादी शाकीर कुरेशी यांच्या फिर्यादीवरून फत्तेपूर  येथील पोलिसांनी १४ आरोपींच्या विरोधात गु.र .नं. २४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १८९(२),१९१(२),१९१(३),१९०,११८(१),३५२,३५१,११५(२) प्रमाणे फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सहा. पो. नि. गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको प्रवीण चौधरी करीत आहे.

Post a Comment

0 Comments