Type Here to Get Search Results !

पहूर येथील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांची अध्यक्ष पदी निवड



दिशा लाईव्ह न्युज , (सौ . गीता भामेरे ) , पहूर , ता  . जामनेर ( ता . ६ )  अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भगवान हिवाळे यांची तर पहुर शहर अध्यक्षपदी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज बोरसे यांची नियुक्ती झाली आहे .



      अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचेराष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे .

          अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून विविध शासकीय योजनांची  योग्य प्रकारे कार्यवाही करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिशा लाईव्ह न्युजशी बोलताना सांगितले .

Post a Comment

0 Comments