Type Here to Get Search Results !

शासनाच्या कार्यालयीन सुधारणा या कार्यक्रमांतर्गत कुऱ्हाड व कळमसरा येथे भटक्या जमातींना जातीच्या दाखल्यांचे वाटप!!


                    कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार .

दिशा लाईव्ह न्यूज ---:::----   महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा  मोहिमेंतर्गत  पाचोरा उपविभागीय  कार्यालयामार्फत कुऱ्हाड व कळमसरा येथे भटक्या  अनुसूचित  जमातीच्या घटकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप बुधवार रोजी सकाळी करण्यात आले.

 शासनाच्या 7 जानेवारी ते 16 एप्रिल या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा या कार्यक्रमांतर्गत पाचोरा उपविभागीय अधिकारी श्री भूषण अहिरे यांच्या उपस्थितीत  कुऱ्हाड तांडा येथील भटक्या मदारी समाजाच्या 20 ते 25 लोकांना तसेच कळमसरा येथील भिल्ल या आदिवासी जमातींना दहा जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.


वर्षानुवर्षे गावोगावी या मदारी समाजाची  उदरनिर्वाहासाठी भटकंती असायची. यामुळे हा समाज अशिक्षित राहून  यांची शासकीय दप्तरी कोठेही नोंद नसल्याने त्यांना शैक्षणिक व शासकीय सवलतीसाठी या दाखल्यांन अभावी अडचणी येत होत्या. म्हणून या समाजातील तरुण वर्गाने वारंवार पाठपुरावा करून ,त्या अनुषंगाने शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुविधा या कार्यक्रमांतर्गत पाचोरा उपविभागीय कार्यालयामार्फत  या समाजाला जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. 


या कार्यक्रमास पाचोरा प्रांत अधिकारी श्री भूषण आहिरे, कुऱ्हाड खुर्द चे ग्राम महसूल अधिकारी नकुल काळकर ,कुऱ्हाड बुद्रुक ग्राम महसूल अधिकारी प्रवीण पवार , म्हसास सजा चे तलाठी नरेंद्र पाटील, कुऱ्हाड बुद्रुक सरपंच शिवाजी पाटील, विलास पाटील ,कोतवाल रवींद्र चव्हाण व कुऱ्हाड  मदारी व कळमसरा येथील भिल्ल समाजाची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments