Type Here to Get Search Results !

चोरी गेलेली बैलजोडी मिळवण्यात गुन्हे शाखा जळगांव व पिंपळगाव हरे पोलिसांना यश!!-कुटुंबासह ग्रामस्थांनी मानले पोलिसांचे आभार!!

  


दिशा लाईव्ह न्यूज-:-  सुनिल लोहार ,कुऱ्हाड ता.पाचोरा =कुऱ्हाड खुर्द,ता.पाचोरा  येथील शेतकऱ्याची  पाच महिन्यांपूर्वी चोरी गेलेली जवळपास सव्वा लाख रुपये किमतीची  बैल जोडी सापडल्याने शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनेस झाला. 

येथील शेतकरी वसंत दौलत शिंपी हे गावातील एक सदन शेतकरी आहेत त्यांच्याकडे सतरा एकर जमीन असून  वर्षभर जमिनीतून पिकवलेल्या उत्पन्नावर त्यांच्या उदरनिर्वाह चालतो.  गावानजीक असलेल्या शेत शिवारातील आखाड्यावर  बांधून ठेवलेली गावरान जातीची बैलजोडी 14 सप्टेंबर 2024 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.ही घटना पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनला कळवली असता ,येथील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व सहकाऱ्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.तेव्हापासून बैलजोडीचा शोध सुरू असताना जळगाव क्राईम ब्रँच व पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या मदतीने गुप्त माहितीनुसार चोरटे  कुऱ्हाड गावातीलच असल्याचा दाट संशय आला .


या प्रकरणातील चार ते पाच संशयित आरोपींना पोलिसांनी विश्वासात घेऊन त्यांनी ही चोरी केल्याचे कबूल केले . चोरून नेलेली जोडी परतूर जिल्हा जालना येथे विकल्याचे सांगितले. हा गुन्हा उघडकीस आणून बैलजोडी आरोपींकडून ताब्यात घेण्यात आली होती.

दिनांक4 रोजी सदर शेतकऱ्याला ही जोडी पिंपळगाव हरे.पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रियेनंतर  ताब्यात देण्यात आली.पोटच्या लेकरा प्रमाणे जपलेली जिवाभावाची बैल जोडी सुखरूप  परत मिळाल्याने या शेतकरी कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.सदर या शेतकऱ्याने बैल जोडी मिळताच गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.ही बैलजोडी घरी आल्यावर पुरणपोळीचा घास भरविण्यात आला.



 कुर्हाड   गावातील  महिलांनी घरोघरी या जोडीचे औक्षण केले . या वापस मिळालेल्या जोडीमुळे जणू  गावात पोळा सण असल्याचा भास होत होता. 

जोडी चोरी गेल्यानंतर शेतकरी वसंत शिंपी यांनी  आठ दिवस अन्नत्याग केला होता. जोडीच्या विरहात त्यांचे कुटुंब हतबल होत लोकांसमोर  ढसाढसा रडत होते. तसेच शेतकऱ्याचा कुटुंबाचा एक हिस्सा असलेल्या भर रब्बी हंगाम पेरणीच्या सुरवातीस ही  बैलजोडी चोरी गेल्यानंतर या शेतकऱ्याला मशागतीसाठी वणवण फिरावे लागले होते.

परंतु त्यांना वाटत होते की आता आपल्याला ही जोडी मिळणारच नाही म्हणून त्यांनी आशा सोडली होती.

परंतु गुन्हे शाखा जळगाव व स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका गुप्त माहितीनुसार त्यांनी या बैल जोडी चोरीचा तपास केला . व कुऱ्हाड गावातील चार ते पाच आरोपी पकडून सदर चोरीस गेलेली बैलजोडी सुखरूप मिळून दिली.

सदर कुटुंबाने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments