दिशा लाईव्ह न्युज : हृदयस्पर्शी वृत्त ( सौ .गीता भामेरे ) पहूर , ता . जामनेर ( ता . ५ ) हृदयविकाराने मृत्यू झालेल्या दुर्दैवी पित्याच्या चितेला चिमुकल्या कन्येने अग्नीडाग दिला . याप्रसंगी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या साऱ्यांनाच गहिवरून आले .
पहूर येथील सिद्धेश्वर गोविंदा जाधव यांचे आज बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ( ता . ५ ) झोपेत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले .
अभ्यासू असलेले सिद्धेश्वर जाधव कायदा आणि व्यवस्थापन शास्त्राचे पदवीधर होते . त्यांच्या निधनाने पहूर गावावर शोककळा पसरली आहे . त्यांची एकुलती एक मुलगी साक्षी हिने वडिलांच्या चितेला अग्नीडाग दिला .
वडिलांच्या पार्थिवास अग्नी देण्याची दुर्दैवी वेळ नियतीने सहावीत शिकणाऱ्या चिमुकल्या साक्षीवर आणली .
मयत सिद्धेश्वर जाधव हे मोतीलाल केशव जाधव यांचे पुतणे तसेच सागर गोविंदा जाधव यांचे मोठे भाऊ होत .
Post a Comment
0 Comments