दिशा लाईव्ह न्यूज -:- सध्या पुन्हा एकदा चोरट्यांनी जळगांव जिल्ह्यत डोके वर काढले आहे. मागील आठवड्यात लोहारा येथे चोरट्यानी धुमाकूळ घालून ऐकाच रात्री 5 दुकाने व 3 घरे फोडून लाखोंचं ऐवज लंपास केला होता.
सदर घटना ताजी असतांना पुन्हा एकदा चोरट्यांनी पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावातील भारतीय स्टेट बँक या शाखेचे कुलूप तोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला आहे. ही घटना आज सकाळी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे.
चोरट्यांनी बँकेमध्ये आत प्रवेश करून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला गेला परंतु लॉक हाय सेक्युरिटी असल्यामुळे चोरी करण्याचा रोकड लुटण्याचा या चोरट्यांचा प्रयत्न या ठिकाणी फसला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे घटनास्थळी पोहोचले असून त्यासोबत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके,डी. बी.पोलीस योगेश पाटील,पोलीस कर्मचारी अशोक हटकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण पाटील या टीमने चौकशी सुरू केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे सदर घटने दरम्यान चोरट्यांनी आत मध्ये काय केले याबाबतची माहिती अस्पष्ट आहे.
Post a Comment
0 Comments