नितेश राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये एकही मुस्लिम बांधव न होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा सांगतो सिद्धी इब्राहिम, सिद्धी जोहर ,मसुद खान, अंबर वहाब ,शमा खान ,इब्राहिम पठाण ,दाऊद खान हुसेन खान, जाफर खान, मदारी मेहतर, काझी हैदर ,मोहम्मद खान व हकीम खान आदी मुस्लिम सरदारांच्या नावाचा या इतिहासात समावेश आहे .
यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा सहभाग होता, त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या देखील होत्या जर राणे म्हणतात ते खर असेल तर तो इतिहास चुकीचा आहे व त्या इतिहासकारावर गुन्हा दाखल केला पाहिजे .मात्र हा इतिहास जर खरा असेल तर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अरुण पाटील यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments