Type Here to Get Search Results !

पहूरच्या दोन लेकींचा अपघाती मृत्यू! पिंपळगाव हरेश्वरमध्ये अंत्यसंस्कार; परिसरात शोककळा


                              कल्पना क्षिरसागर


 दिशा लाईव्ह न्यूज -:-  पहूर, ता. जामनेर –

दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पहूर येथील दोन लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांच्यावर सासरी पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


पहिली घटना शनिवारी (ता. १२ जुलै) दुपारी घडली. कल्पना एकनाथ क्षीरसागर (वय ३२, रा. उल्हासनगर) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले.


                              प्रीती गीते

दुसरी हृदयद्रावक घटना रविवारी (ता. १३ जुलै) सकाळी आठच्या सुमारास घडली. प्रीती तुकाराम गीते या पिंपळगाव हरेश्वर येथून पहूर येथे नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी दुचाकीने येत असताना चिलगाव फाट्याजवळ अपघातात त्यांचे निधन झाले.


दोघीही महिलांचा मूळ संबंध पहूर गावाशी असून त्या सध्या सासरी पिंपळगाव हरेश्वर येथे राहात होत्या. या दुहेरी अपघाती मृत्यूच्या घटनेने पहूर व पिंपळगाव हरेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.

संपर्कात असलेल्या नातेवाइकांत हळहळ व्यक्त केली जात असून, अपघात रोखण्यासाठी अधिक सुरक्षिततेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments