Type Here to Get Search Results !

जळगांव येथील मराठी पत्रकार संघाचे मा अध्यक्ष विवेक खडसे यांच्या आईचे वृद्धपकाळात निधन.- आज रात्रीच 10.45 वाजता होणार अंत्यसंस्कार!.




दिशा लाईव्ह न्यूज -:-   जळगाव येथील इंटरनॅशनल कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक श्री विवेक पंडित खडसे यांच्या मातोश्री कै. चमेली बाई पंडितराव खडसे यांचे  आज दिनांक 13 जुलै 2025 रोजी  दुपारी 12:50 वाजता वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धपकाळाने  दुःखद निधन झाले. त्या लोहारा येथील विद्यालयातील मा.शिक्षक स्व.पी.के.खडसे सर यांच्या धर्मपत्नी होत्या.

त्यांच्यावर आजच रात्री ठीक 10.45 मिनिटांनी जळगांव येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पक्षात एक मुलगा ,दोन मुली ,सुना व नातवंड असा परिवार आहे.

त्या जळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मा.ग्रामीण अध्यक्ष श्री विवेक खडसे यांच्या मातोश्री होत्या.

दिशा लाईव्ह न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments