Type Here to Get Search Results !

विद्यार्थी आत्महत्या प्रकरण... . . .अखेर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.न्याय देण्याची पालकांची मागणी.गुन्हा दाखल झाल्याशिवाय आमची माघार नाही-पालक.



दिशा लाईव्ह न्युज --

पहूर, ता. जामनेर येथील बारावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर तब्बल चार दिवसांनी अखेर पालकांच्या संतप्त मागणीनंतर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


४ जुलै रोजी महेश अनिल गोल्हारे (वय १७), बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याने राहत्या घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबियांनी संशयितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक दिली.


या दबावामुळे अखेर मुकेश भिकारी जाधव या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.


गुन्हा दाखल न झाल्यास माघार नाही — पालकांचा इशारा


मृयत महेशचे वडील अनिल गोल्हारे व नातेवाईकांनी "गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही" असा ठाम पवित्रा घेतला होता. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सदर प्रकरणाकडे पहूर वासीयांसह जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.


Post a Comment

0 Comments