Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथून बंद घरातून भरदिवसा एक लाखाची चोरी.. सबंधित घरमालक शेतकरी शेतात गेल्याचा चोरांनी घेतला दुपारी फायदा. परिसरातील अवैध धंदे व भुरट्या तसेच मोठ्या चोऱ्या थांबविण्याचे नवीन सहायक महिला पोलिस निरीक्षक यांना आव्हान!!


             कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार .

 दिशा लाईव्ह न्यूज -:-  पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे बंद घरातून एक लाखाची रोकड चोरी गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

येथील शेतकरी धनराज चौधरी व कुटुंब दुपारी शेतातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.



 हे शेतकरी कुटुंब सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांच्या राहत्या घरात ठेवलेल्या रोख रकमेपैकी एक लाख रुपये दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.



घटना घडताच सदर शेतकऱ्याने पिंपळगाव पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली असता पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या नुकत्याच बदलून आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पीएसआय सर्जेराव शिरसागर , पोलीस हवालदार नामदेव इंगळे,राहुल बेहरे,अमोल पाटील , ए एस आय अरविंद मोरे,अतुल पवार , शैलेश चव्हाण आदी सहकार्यांनी  घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.या वेळी काही संशयित लोकांना ताब्यात घेत चोरीचा पुढील तपास लोहारा दूरक्षेत्र पोलीस करीत आहे.



Post a Comment

0 Comments