Type Here to Get Search Results !

पहूर येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आज पासून सप्ताहास प्रारंभ ; दररोज भजन, हरिपाठ व कीर्तनाचे आयोजन


दिशा लाईव्ह न्यूज – पहूर, ता. जामनेर

                            ✍️ सौ. गीता भामेरे.


पहूर येथे संत शिरोमणी सावता महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून आज १६ जुलै बुधवारपासून या सोहळ्याला महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालयात महापूजनाने सकाळी ८.३० वाजता प्रारंभ होणार आहे.


या धार्मिक सप्ताहाचे आयोजन स्वर्गीय जनार्दन महाराज यांच्या कृपेने आणि कैलासवासी ह.भ.प. शंकर महाराज यांच्या प्रेरणेने करण्यात आले आहे.


दररोजचे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:

सकाळी ५ ते ६ - काकडा भजन


सायंकाळी ५ ते ६ - हरिपाठ


रात्री ८.३० ते १०.३० - हरी कीर्तन


 *कीर्तनाचे विशेष आयोजन* :

१६ जुलै – ह.भ.प. साहिल महाराज तळेगावकर


१७ जुलै – ह.भ.प. विशाल महाराज बोरनार


१८ जुलै – ह.भ.प. तुकाराम महाराज मेहूण


१९ जुलै – ह.भ.प. रविदास महाराज वडगाव लांबे


२० जुलै – ह.भ.प. मुरलीधर महाराज कढरेकर


२१ जुलै – ह.भ.प. दत्ता महाराज साक्री


२२ जुलै – ह.भ.प. अरुण महाराज पारस


२३ जुलै सकाळी ९ ते ११ – ह.भ.प. यशवंत महाराज कमळगावकर यांचे काल्याचे कीर्तन


                          सप्ताहाचा समारोप:

२३ जुलै रोजी कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ वाजता संत सावता महाराजांच्या पालखी सोहळ्याने सप्ताहाची सांगता होणार आहे .

या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी

ह.भ.प. मुकुंद महाराज

राजू जाधव, दिलीप बाविस्कर, दीपक जाधव, ज्ञानेश्वर करवंदे

क्षत्रिय माळी समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे,

श्री समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल राऊत

यांच्यासह सर्व विश्वस्त, भजनी मंडळ आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

सर्व भाविकांनी या सप्ताहात मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments