Type Here to Get Search Results !

चितळीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न शिक्षकांनी गावाविषयी केला आदरभाव व्यक्त


दिशा लाईव्ह न्यूज -:- पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-

पाथर्डी तालुक्यातील चितळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा निरोप समारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत आनंदी व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी गणेश वाघ हे होते.

 शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. कैलास सदामत, राधिका खटावकर व अनुपमा जाधव-भालेराव या तीन शिक्षकांची चितळी मधील प्रदीर्घ सेवेनंतर बदली झाली असून त्यांच्या जागी कृतिशील शिक्षक श्री. अरुण नरवणे, प्रतिभा नरवणे, व आदर्श शिक्षक बाळासाहेब माने या शिक्षकांची नियुक्ती झाली असून बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ व नवोदित शिक्षकांचा स्वागत समारंभ असा दुध  शर्र्करायोग आजच्या कार्यक्रमांमध्ये घडून आला होता.

     यावेळी विचार मंचावर सागर भालेराव, दादाभाऊ ढमाळ, बाळासाहेब वलवे, संदीप साळवे, अनिल कोठुळे, बाबा आमटे, मोहन कोठुळे, भीमराज ताठे, बाळासाहेब ताठे, पांचाळ सर, कवी बाळासाहेब कोठुळे, अनुपमा जाधव, राधिका खटावकर, कैलास सदामत, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक संगीता बर्डे- गव्हाणे यांनी केले. त्यावेळी त्या म्हणाल्या आजच्या कार्यक्रमात आसु अन् हासु असा दुहेरी संगम आज घडून आला आहे. माझे शालेय कामकाजातील सहकारी म्हणून ज्यांनी मला साथ दिली ते आज दुसऱ्या शाळेमध्ये हजर होत असून मला नवीन सहकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी होत आहे. नोकरीमध्ये बदली ही औपचारिक असून ती अपरिहार्य आहे. माणुसकी जागृत ठेवून भविष्यामध्ये आपण वाटचाल करायची आहे. 

यावेळी द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे, शाळा व्यवस्थापन समिती, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोटफोडे, बाबा आमटे, रिल्स स्टार संदीप साळवे, आदिनाथ ढमाळ, यांच्यासह अनेक विद्यार्थी व पालक यांनी शिक्षकांचे सत्कार केले.

 सत्कारमूर्ती कैलास सदामत यांनी शाळेसाठी भिंतीवरचे घड्याळ, राधिका खटावकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पितळी समयी, व अनुपमा जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट म्हणून दिल्या.

      यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये विशेषतः सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे, बाबा आमटे, बाळासाहेब कोठुळे, दादाभाऊ ढमाळ, बाळासाहेब वलवे, सागर भालेराव यांनी शाळे प्रती असलेला आदरभाव व शिक्षका विषयी गौरव उदगार काढले. सत्कार ला उत्तर देताना अनुपमा जाधव यांनी कविता सादर केली

 

ओंजळीतून तुमच्या आज

फुले मोगऱ्याची घेताना

दरवळले मन माझे अन

भारावला आसमंत ही सारा


ही कविता सादर करून मनातल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर कैलास सदामत यानी मुख्याध्यापकांनी माझे व्यवस्थापन कौशल्य विकसित केले व ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी आपल्यावर केलेल्या प्रेमाची कधीच उतराई होणार नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या तर राधिका खटावकर यांनी या शाळेमध्ये आज्ञाधारक विद्यार्थी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, शाळेने मला प्रेम ,माया,व आपुलकी या गोष्टी दिल्या अशा शब्दात आपले विचार मांडले . तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षका विषयी असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

   या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार  सूत्रसंचालन सविता रजपूत व सोनाली ससाने यांनी केले तर बाळासाहेब माने यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,ग्रामस्थ व महिला पालक मोठ्या प्रमाणावर हजर होते.



Post a Comment

0 Comments