Type Here to Get Search Results !

धुळ्यात तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहन देण्याचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीचा उपक्रम कौतुकास्पद - सौ. अल्पाताई अग्रवाल



दिशा लाईव्ह न्यूज --::-- -धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्हा वतीने पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेटी बचाव बेटी पढावच्या अध्यक्षा सौ. अल्पाताई अग्रवाल होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून अजय भदाणे सर, प्रदेश महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी, सौ. मायाताई परदेशी, सुमनकाकू महाले, विभागीय अध्यक्ष शशिकांत चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास काळू चौधरी, विनोद मंडपाचे मालक विनोद चौधरी, आरती ताई महाले, रूपाली ताई महाले, कल्पना अशोक चौधरी या होत्या. यावेळी अल्पाताई अग्रवाल म्हणाल्या की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहन देण्याचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले तर महिला मंडळ मा. जिल्हा अध्यक्षा सौ. सुमन काकू महाले यांनी प्रांतिक महिला आघाडीचे वर्षभर स्तुत्य कार्यक्रम घेत असतात तर मुलांच्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.



 रस्ता सुरक्षा पथकाचे समादेशक अजय भदाणे सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. भाजपा ओबीसी महिला आघाडी उपाध्यक्षा सौ. माया ताई परदेशी यांनी गुणी विद्यार्थी कौतुक करताना सांगितले की, आपल्या यशामुळे कुटुंबासोबत समाज व देशाचे नाव मोठे होत असते तर प्रांतिक तैलिक महिला आघाडीला सहकार्य करण्याचे सुचविले. प्रास्ताविकात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष सौ छायाताई करनकाळ म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही महाराष्ट्रातील तेली समाजातील सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. रामदास तडस, कार्याध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भुषण कर्डिले, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे, सहसचिव सुनील चौधरी, महिला आघाडी अध्यक्षा सौ. पुष्पाताई बोरसे, युवा आघाडी प्रदेश महासचिव  नरेंद्र भाऊ चौधरी . विभागीय उपाध्यक्ष वैशाली ताई चौधरी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात समाज संघटन व विविध उपक्रम या पुढेही राबविण्यात येतील असे सांगितले. 

यावेळी तेली समाजातील सुमारे ६७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. रूपाली चौधरी, पिंपळनेर, जिल्हा सचिव दिलीप सुर्यवंशी यांनी केले. त्यांच्या सुत्रसंचलनचे सर्वच वक्त्यांनी कौतुक केले. 

कार्यक्रम संपल्यानंतर प्रमुख अतिथी,विद्यार्थी, पालक व समाज बांधवांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनाची व्यवस्था धुळ्यातील विनोद मंडपाचे मालक विनोद चौधरी, पाणी बाटली हेमलता अनिल भाऊ चौधरी यांनी तर सन्मानचिन्ह प्रांतिक तैलिक विभागीय अध्यक्ष शशिकांत चौधरी, सन्मानपत्र छाया करनकाळ, पुष्प गुच्छ मनिषा सजन चौधरी, महेश चौधरी . आनंद कर्दनकाळ .तर उर्वरित सर्व खर्चासाठी नरेंद्र भाऊ चौधरी व मुकेश थोरात यांचे सहकार्य लाभले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, विभागीय अध्यक्ष शशीकांत चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास काळू चौधरी,  विभागीय निरीक्षक तुषार चौधरी, जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ. छाया ताई करनकाळ, जिल्हा संघटक रमेश शंकर करनकाळ, जिल्हा सचिव दिलीप सुर्यवंशी, मुकेश किशोर थोरात, ॲड. ललित महाले, ॲड. प्रविण दिलिप चौधरी, जितेंद्र चौधरी, राजू गणपत चौधरी, निलेश माऊली चौधरी, महेश चौधरी, अनिल थोरात, सजन पहेलवान चौधरी, विनोद चौधरी, कल्पेश चौधरी, विलास चौधरी, आनंद करनकाळ, यशवंत चौधरी, अनिल भाऊ चौधरी , मनोज भैय्या चौधरी,अनिल भाऊ अहिरराव, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिनेश बागुल विजय नेरकर सर, मनोहर सर, गणेश चौधरी, किरण चौधरी, डॉ.गणेश चौधरी, पप्पू शेठ अहिरराव, संजय चौधरी सर तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महीला आघाडी विभागीय उपाध्यक्ष सौ. वैशाली चौधरी, शोभाताई किशोर थोरात, सौ. मनिषा राजेंद्र चौधरी, सौ. मनिषा सजन चौधरी, सौ. दिपाली तुषार चौधरी, सौ. प्रियंका कल्पेश चौधरी, सौ. हेमलता अनिल चौधरी, सौ. रिटा प्रदीप बागुल, सौ. गिता मुकेश थोरात, सौ. कावेरी आनंद करनकाळ, सौ. निरंजनी विनोद चौधरी, सौ. वर्षा गणेश चौधरी सौ. कविता जितेंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारींनी केले.



Post a Comment

0 Comments